shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर व उत्तर नगर जिल्ह्यातील निवडणुका मनसेकडून पूर्ण ताकदीने लढणार – जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

श्रीरामपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात नुकतीच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या – म्हणजेच नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे होते. त्यांच्यासोबत जिल्हा सचिव संजय नवथर, तालुका अध्यक्ष अमोल साबणे, शहर अध्यक्ष सतीश कुदळे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले,

“मनसे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर पूर्ण ताकदीने लढवणार आहे. स्थानिक पातळीवर इतर कोणत्याही पक्षाने सन्मानपूर्वक युतीचा प्रस्ताव दिल्यास, तो राजसाहेब ठाकरे आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतरच ठरवला जाईल. पण युती झाली किंवा नाही, मनसे आपली ताकद दाखवून देणार आहे.”

ते पुढे म्हणाले की,

“प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने काम करून उमेदवारांना विजयी करण्यासाठी आत्तापासूनच जोरदार तयारीला लागावे. हीच वेळ आहे मनसेची ताकद दाखवून देण्याची.”

बैठकीत आगामी निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची नावे, त्यांचे स्थानिक समर्थन, प्रचाराचे नियोजन आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी यावरही सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीस जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव संजय नवथर, तालुका अध्यक्ष अमोल साबणे, शहर अध्यक्ष सतीश कुदळे, तालुका सचिव भास्कर सरोदे, शहर सचिव महेश सोनी, तालुका संघटक विलास पाटणी, शहर संघटक निलेश सोनवणे, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल ठोंबरे, शहर उपाध्यक्ष मारूती शिंदे, तसेच सोमनाथ पवार, संदीप विश्वंभर, प्रवीण कारले, सचिन कदम, राजू जगताप, प्रसाद परहे, किशोर भागवत, दीपक सोनवणे, मच्छिंद्र हिंगमिरे, सुजित गायकवाड, संतोष धुमाळ, सुरज जोशी, अमोल वडीतके, बाळासाहेब ढाकणे, किरण वानखेडे, सुनील करपे, फिरोज सय्यद, सरताज सय्यद, सौरभ निर्मळ, किशोर शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठक अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली असून मनसे कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकीसाठी नवचैतन्य निर्माण झाले आहे.

close