कलाकारांच्या कला,कवींचे काव्य आणि घरगुती फराळाचा एकत्र बसून मनसोक्त आस्वाद म्हणजेच साहित्य सम्राट संस्थेची दरवर्षीची "शब्दगोड दिवाळी" - अष्टुळ
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
साहित्य सम्राट पुणे ही संस्था "शब्द गोड दिवाळी" हा नाविन्यपूर्ण उपक्रम गेली चौदा वर्षे सातत्याने साजरी करते आहे, शब्द जोडतात आणि तोडतातही त्यामुळे आपण शब्द जपूनच वापरले पाहिजे. दिवाळीच्या फराळामध्ये जसे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ असतात, त्याप्रमाणेच आज सर्वांनी सुंदर - सुंदर कला कविता सादर केल्या. असे कार्य करत असताना अनेक कष्ट करावे लागतात. लोकांचे बोलणे ऐकायला लागतात. सगळं सहन करून काहीतरी करायचं आणि चांगलंच करायचं हे उद्दिष्ट ठेवून विनोद अष्टुळ मनापासून सातत्याने कार्य करत असतात. त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देखील भरपूर मिळतात असे विचार अध्यक्षीय मनोगतात मंदाताई नाईक यांनी व्यक्त केले.
साहित्य सम्राट संस्थेच्यावतीने कला काव्य फराळाची "शब्द गोड दिवाळी" या उपक्रमांतर्गत २११ वे कवी संमेलन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था नेहरू स्टेडियम पुणे याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी विचारपीठावर अध्यक्षा मंदाताई नाईक, डी.एस.एस माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे, प्रमुख पाहुणे प्रा. अरुण बुंदेले, राजेंद्र सगर आणि साहित्य सम्राट संस्थेच्या सचिव अर्चनाताई अष्टुळ आदि मान्यवर उपस्थित होते.
कलाकारांच्या कला, कवी कवयित्रींचे काव्य आणि घरी बनविलेला स्वादिष्ट फराळ यांचा एकत्र बसून मनसोक्त आस्वाद घेणे म्हणजे साहित्यसम्राटची ही दरवर्षीची शब्दगोड दिवाळी असल्याचे विचार संस्थापक विनोद अष्टुळ यांनी प्रास्ताविकात मांडले.
या कलागुण संपन्न कार्यक्रमात मान्यवरांसह कांताभाऊ राठोड, राम सर्वगोड, नकुसाताई लोखंडे, राहुल भोसले, दशरथ दुनघव, जनाबापू पुणेकर, जयश्री भोसले, प्रा.डॉ.बी. एन.चव्हाण, छगन वाघचौरे, शिवाजी उराडे, नानाभाऊ माळी, नंदकुमार गुरव, अंजली लाळे, अर्चना अष्टुळ, राजेंद्र सगर, अलका जोशी, विजय जाधव, विजय सातपुते, प्रा.बाबासाहेब जाधव, किशोर कसबे, दादासाहेब सोनवणे, प्रिया दामले, अरुण बुंदेले, प्रा. आनंद महाजन, चंद्रकांत जोगदंड, जगदीप वनशिव, चंद्रकांत गायकवाड, क्षितिज खरात, बाळू पाटोळे, सुजित रणदिवे आणि विनोद अष्टुळ अशा सर्वांच्या कलागुणांनी रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सगर यांनी तर आभार कांताभाऊ राठोड यांनी व्यक्त केले.
*वृत्त विशेष सहयोग
साहित्यिक विनोद अष्टूळ - पुणे
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

