श्रीरामपूर / प्रतिनिधी:
दि. (३१/१०/२०२५) रोजी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने नवनागापूर अहिल्यानगर मध्ये ' रन फॉर युनिटी ' चा ऐतिहासिक क्षण मोठ्या उत्साहात पार पडला. पोलीस दल, वीर सैनिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येत देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा संकल्प केला. हे पाऊल केवळ धावणे नव्हते, तर आपल्या राष्ट्राप्रती असलेली उत्कट राष्ट्रभक्ती होती.
या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार ठरलेल्या आणि कार्यक्रमाला मार्गदर्शन केलेल्या सर्व सन्माननीय मान्यवर ' वीर सैनिक संस्था ' तथा उपस्थितांमुळे याप्रसंगी देशभक्तीपर मोठी उर्जा निर्माण झाल्याचे दिसून आले.
याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश वमने,सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक भाऊसाहेब चौधरी, वीर सैनिक बहुउद्देशीय संस्थे चे अध्यक्ष मेजर बाबासाहेब तेलोरे, सचिव रावसाहेब गोरे , खजिनदार संतोष गायकवाड, कार्याध्यक्ष गोरख काळे,सल्लागार किसनराव कांबळे, संचालक अनिल गुजर,ज्येष्ठ माजी सैनिक श्री रामदास ठोकळ, माजी सैनिक सदस्य सर्वश्री भाऊसाहेब डाके,किशोर पांढरे,राजेंद्र काळे,शंकर भापकर,कानडे साहेब,
रोडे साहेब तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या संघटनांचे सर्व सभासद आणि पदाधिकारी यांचे 'वीर सैनिक संस्थे' तर्फे
आभार मानण्यात आले
*वृत्त विशेष सहयोग
मेजर बाबासाहेब तेलोरे - अहिल्यानगर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

