प्रकाश मुंडे/केज प्रतिनिधी
डीजे/डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन आकाश संतोष लांडगे या तरुणाला जीव गमवावा लागल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर, केज शहरातील युवकांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि सामाजिक संदेश देणारा संकल्प केला आहे. समर्थ नगर भागातील आकाश संतोष लांडगे (वय २३) या युवकाचे दोन दिवसांपूर्वी डॉल्बीच्या आवाजाने दुखद निधन झाले होते. आकाशच्या या अकाली निधनानंतर केजच्या युवकांनी डॉल्बी संस्कृतीला मूठमाती देण्याचा निर्धार केला आहे.
नेमका काय आहे संकल्प?
आकाश लांडगे यांच्या श्रद्धांजली सभेसाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवकांनी भावूक होऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला. यापुढे केज शहरात 'डॉल्बी' (DJ) वाजवणार नाही, असा त्यांनी सामूहिक संकल्प केला आहे. डॉल्बीच्या ध्वनी प्रदूषणाचे आणि आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांचे गांभीर्य लक्षात घेऊन युवकांनी हा धाडसी व स्तुत्य निर्णय घेतला आहे.
मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना
या श्रद्धांजली व संकल्प कार्यक्रमास केज शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आकाशला श्रद्धांजली वाहून युवकांच्या या निर्णयाचे भरपूर कौतुक केले.
उपस्थित मान्यवर: गटनेते हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ सिताताई बनसोड,गंधले महाराज,
माजी नगरसेवक शिवाजी आप्पा हजारे,
हनुमंत भोसले सर,
भाई मोहन गुंड, रणजित खोडसे ,
अशोक सोनवणे,
विजय आरकडे, लक्ष्मण जाधव,शकिल सय्यद, धनंजय घोळवे,संजय कोरडे, विजय वनवे,
विजय आंंडिल,
सुलेमान काजी,
कवी गायकवाड,
शिवाजी घुले साहेब, पंकज तेलंग,
राजेभाऊ कुचेकर , आभी लोखंडे
या सर्व मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत आकाश लांडगे याच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले, आणि युवकांनी घेतलेल्या 'डीजे बंदी'च्या संकल्पाला पूर्ण पाठिंबा दर्शवला.
सामाजिक संदेश: एका निष्पाप जिवाच्या बलिदानाने केज शहरात ध्वनिप्रदूषण आणि हृदयविकाराचे गांभीर्य समोर आले आहे. केजच्या युवकांनी घेतलेला हा निर्णय इतर शहरांसाठी एक आदर्श ठरू शकतो, ज्यामुळे अनावश्यक डॉल्बीचा कर्कश आवाज टाळण्यास मदत होईल.


