निमगाव केतकीत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत तब्बल वीस वर्षानंतर स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून दिला जुन्या आठवणींना उजाळा.
इंदापूर : महात्मा फुले विद्यालय निमगाव केतकी ता. इंदापूर येथील सन २००५ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत तब्बल वीस वर्षानंतर स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमगाव केतकी येथील यशराज गार्डन या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आली. यावेळी दिपप्रलोजन बाबा वडापुरे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
अनिकेत मिसाळ यांचा गायनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला.
विद्यार्थी परशुराम बरळ, सुनील डोंगरे, कुंडलिक कचरे, गणेश शेंडे, संपत बनसोडे, गणेश आदलिंग, आजिनाथ लोखंडे, विनायक कचरे, दादा म्हेत्रे यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत जिवनाविषयी माहिती दिली.
यावेळी विद्यार्थिनी रेखा शेंडे, वैशाली भोंग, माधुरी शेंडे, संगीता खराडे, रूपाली शेंडे, दिपाली जाधव, अलका खराडे, उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण डोंगरे यांनी केले. तर आभार दत्तात्रय मिसाळ यांनी मानले.

