प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २७ / सावकारी जमीनीच्या वादातून नगर तालुक्यातील बाबुडीॅ घुमट येशील शेतकरी कुटुंबातील तिनं व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून जीवे माराण्याचा प्रयत्न करण्यात आला . सदर घटना स्थळवरून जखमी कुटुंबाने पोलिस नियंत्रण कक्ष ११२ संपर्क करुन पोलिस मदत मिळवली .
सविस्तर माहिती प्रमाणे या बाबत समजलेली माहिती नुसार बाबुडीॅ घुमट येथील कानिफनाथ भगत व आरोपी यांचा या पुर्वी म्हणजे २००७ मध्ये गट क्रमांक २८७ मधील सावकारीतुन जमीनीचा व्यवहार झाला होता. त्या जमीनीच्या वादात भगत कुटुंबाच्या बाजुने न्यायलयाने मनाई हुकूम निकाल दिलेला आहे.या जमीनीचा वाद सावकाराचे जिल्हा उपनिबंधक याच्या कोर्टात चालू आहे.त्यांचा मनात राग धरून आरोपी नामें पांडुरंग शंकर बोरुडे, आदेश पांडुरंग बोराडे, सुशांत पांडुरंग बोरूडे, सिंधुताई पांडुरंग बोरूडे, ईतर दोन अनोळखी आरोपींनी संगनमत करून रविंद्र काशिनाथ भगत, यांच्या शेतात जाऊन रविंद्र कानिफनाथ भगत, वडील कानिफनाथ मारूती भगत,(वय ४५) आई मीनाबाई कानिफनाथ भगत(वय ४०) यांना तालावर ,चाॅपर,गज, काठ्या नि जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात पायावर पोटावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी रविंद्र कानिफनाथ भगत यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर ७३२/२०२२ भाद वि कलम ३०७, १४३,१४७,१४८,१४९, शस्त्र अधिनियम ०४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हात वापरण्यात आलेली चारचाकी वाहन व आरोपी गजाआड असतील असे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले आहे. सदर चार आरोपीना अटक करण्यात आलेली आहे न्यायालयात समोर हजर करून केले असता न्यायालयाने सदर आरोपीस चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे , साह्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी जखमी कुटुंबाची समक्ष भेट घेऊन तब्येत विचारपूस केली आहे.
लवकरच सर्व आरोपी गजाआड असतील . या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस स्टेशनचे साह्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप हे करत आहेत .