इंदापूरात घडले माणुसकीचे दर्शन ..मनोरुग्ण महिलेला दिले कुटुंबीयांच्या ताब्यात.
इंदापुरातील सामाजिक कार्यकर्ते व इंदापूर पोलिसांचे होत आहे कौतुक.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील एक माणुसकीचे दर्शन घडणारी घटना दिनांक १२ ऑक्टोबर रोजी घडली. रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपापल्या परीने आपले जीवन जगण्यासाठी अनमोल वेळ व्यतीत करीत असतात. जीवनाचा रणगाडा चालवत असतात. अशा धावपळीच्या जीवनामध्ये ही काही सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं इंदापुरात आपल्याला दिसून येतात. इंदापुरातील शहरात एका अनोळखी महिलेला तात्काळ मदत आणि कुटुंबीयांची भेट घडवून आणण्यामध्ये या शहरातील नागरिक व पोलीस खरंच कर्तव्यदक्ष असल्याचे दर्शन आजच्या घटनेतून घडल्याचे दिसून येत आहे.
इंदापुरात आढळून आलेली मनोरुग्ण महिला ही नक्की कोणाची असावी असा मुश्किल प्रश्न पडला असताना सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांना एक प्रकारचे आव्हानच उभा राहिले होते. असे असतानाही" प्रयत्नांती परमेश्वर" या उक्तीप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्यांच्या व पोलिसांच्या कार्य कुशलतेने या महिलेचा कुटुंबीयांचा पत्ता शोधण्यास अखेर यश आले.
हकीकत अशी आहे की, बाबा चौकात एक तरुण महिला कालपासून येथे बसलेली आढळून आलेली आहे. कदाचित ती मनोरुग्न असावी अशा पद्धतीची माहिती सामाजिक कार्य करते सतीश चौगुले यांनी युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापकप्रशांत सिताप यांना फोन करून माहिती दिली असता. प्रशांत सीताप यांनी
तात्काळ या ठिकाणी धाव घेत पोलीस स्टेशनच्या खंडागळे मॅडम, महिला दक्षताच्या सायरा आतार, अनिताताई खरात, कल्पनाताई भोर यांना फोनवर कल्पना देऊन मदतीला बोलावले.
याचवेळी इंदापूर पोलीस स्टेशनच्या मुजावर मॅडम, सायरा आतार, अनिताताई खरात या आल्यानंतर या महिलेच्या पत्ता मिळवण्यासाठी गेली ३ तास चौकशी केली असता त्या महिलेकडून व्यवस्थित रित्या माहिती सांगता येत नसल्याने मोठा प्रश्न पडला होता. सीताप यांनी आणलेली शाल त्या महिलेला थंडी वाजत आहे म्हणून दिली. सदर महिलेला पत्त्यासंदर्भात विचारले असता कधी बोरवली तर कधी धाराशिव अशा गावांच्या नावांची माहिती देत होती. स्पष्टपणे गावांची नावे न सांगितल्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला.अशावेळी सायरा आतार यांनी गप्पा मारत मारत तिच्याकडे स्टेट बँकेचे एटीएम कार्ड आहे हे कळाले आणि पुढचे काम सोपे झाले. इंदापूर पोलीस स्टेशनच्या वतीने स्टेट बँकेतून अकाउंट डिटियल मागताच नाव, मोबाईल नंबर, पत्ता मिळाला आणि सदर मोबाईल नंबर वर फोन केले असता. आळंदी दिघी येथील अश्विनी सिताराम सुतार अशा या महिलेचे नाव असून त्यांना घेऊन जाण्यासाठी येत असल्याचे त्या महिलेचे भाऊ आणि पती यांनी सांगितले
यावेळी धरमचंद लोढा, बाळासाहेब शिरसागर आल्यानंतर महिला पोलीस यांच्या साह्याने नारळ, पाणी, चहा आपापल्या परीने आणून दिले.
यानंतर संध्याकाळी ५ वाजता इंदापूर पोलीस स्टेशन च्या माध्यमातून सदर महिलेचा भाऊ पती यांच्या ताब्यात नानासाहेब आटोळे, मुजावर मॅडम, खंडागळे मॅडम यांच्या उपस्थितीत या महिलेला ताब्यात देण्यात आले.
ही मनोरुग्ण महिला ज्या रिक्षामध्ये बसली होती ती रिक्षा दिवसभर त्या ठिकाणीच उभी करावी लागली. कारण त्या रिक्षेमधून सदर महिला खाली उतरली न्हवती. त्यामुळे या कामी या रिक्षावाल्याचेही मोठे सहकार्य लाभले.

