शिक्षक समितीचे वतीने शिक्षक पतसंस्थेच्या संचालक मंडळास अल्टिमेटम.
शिक्षक सभासद हितासाठी ऐन दिवाळीत शिक्षक समिती करणार तीव्र आंदोलन.
इंदापूर प्रतिनिधी: दि २१ इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे वतीने शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन व संचालक यांना सर्व सभासदांना सरसकट ३० लाख कर्ज वाटप करावे. कर्ज घेतेवेळी ज्या जाचक अटी घातल्या आहेत त्या रद्द कराव्यात व कर्ज व्याज दर ८% करावा. असे दुसरे लेखी निवेदन देण्यात आले.
आठ दिवसांपूर्वी शिक्षक समितीने निवेदन दिले होते. परंतु संचालक मंडळाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे शिक्षक समितीचे वतीने आज पुन्हा स्मरणपत्र दिले. चार दिवसांत संचालक मंडळाने सभासद हिताचा निर्णय न घेतल्या शिक्षक समिती ऐन दिवाळीत तीव्र आंदोलन करणार असल्याचे शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल यांनी सांगितले.
यावेळी हरिश काळेल , सुनिल शिंदे , विलास शिंदे , मोहन भगत , नितीन वाघमोडे , छगन मुलाणी , संजय लोहार , सतिश खटके , भारत ननवरे , विनय मखरे , दत्तात्रय लकडे , मैनुद्दीन मोमीन , सागर भोसले , प्रताप शिरसट , संतोष हेगडे उपस्थित होते. सचिव प्रशांत भिसे यांनी निवेदन स्विकारले.

