shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईभक्त तात्या पाटलांचे नातू मुकुंदराव कोतेंचे निधन



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) 

साईबाबांचा सर्वाधिक जवळचा संबंध असलेल्या तात्या पाटील कोते यांचे नातू मुकुंदराव बाजीराव कोते (वय ८१) यांचे आज, शनिवार पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. साईबाबांच्या आगमनापासून ते निर्वाणापर्यंत साईबाबांच्या सेवेत असणाऱ्या तात्या पाटलांच्या परिवाराने संस्थान स्थापनेनंतर आजवर साई संस्थान व शिर्डीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 
यामुळे शिर्डीसह पंचक्रोशी व जगभर पसरलेल्या भाविकांमध्ये मुकुंदराव कोते यांना आदराचे स्थान होते. साईबाबांची दर गुरुवारी काढण्यात येणारी पालखी मिरवणूक, उत्सवातील कार्यक्रमातही ते हिरिरीने सहभागी होत साईदरबारी परंपरागत मान असलेले मुकुंदराव आण्णा या आदरार्थी नावाने ते सुपरिचित होते. शिर्डीचे सरपंच, शिर्डी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व शिर्डी सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष व शिर्डी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक तसेच अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. त्यांच्या पश्चात सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मिलिंद कोते, राष्ट्रवादीचे नेते व शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते व शामला सावंत यांचे ते वडील तसेच गौतम सहकारी सह बँकचे अध्यक्ष बाबासाहेब कोते यांचे ते बंधू होत.
close