केज तालुक्यातील अतिशय प्रसिद्धीची ठरलेली सांगवी सारणी ग्रामपंचायत भाजप नेते दत्ता धस व सुभाष बिक्कड यांच्या नेतृत्वाखाली संजय केदार यांच्या ताब्यात आली आहे.
पुर्वी हि ग्रामपंचायत केज तालुका अध्यक्ष भगवान केदार यांच्या ताब्यात होती. यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस व केज भाजप तालुका अध्यक्ष भगवान केदार यांनी एकञ गट करून निवडणूक लढवली होती.
तरी सुद्धा त्यांच्या गटाचा मानहानी कारक पराभव झाला आहे. तर दत्ता धस व सुभाष बिक्कड यांच्या नेतृत्वाखाली संजय केदार यांच्या गटाचा दणदणीत विजय झाला आहे. या निकालाने केज तालुक्यात खळबळ माजली आहे. सरपंच पदावर लक्ष्मी संजय केदार व इतर सर्व विजयी सदस्यांची गावात भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.
केज तालुक्यातील अनेक ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात निकाल लागल्यानंतर राजकीय मंडळी मध्ये एकच खळबळ माजली आहे. तर केज तालुक्यातील जनतेमध्ये या विजयाची व केज तालुका अध्यक्ष भगवान केदार यांच्या झालेल्या पराभवाची जोरदार चर्चा चालू आहे.

