पडस्थळ ग्रामपंचायत ही विकासाबाबतीत तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात एक नंबर करण्याचा प्रयत्न करू- माजी सभापती पांडुरंग मारकड.
पडस्थळ येथे तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने सरपंच पदी वैशालीताई मारकड व सदस्य पदी रेश्माताई रेडके यांची निवड झाल्याने केला सत्कार
इंदापूर प्रतिनिधी: पडस्थळ ग्रामपंचायत ही विकासाबाबतीत तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात एक नंबर करण्याचा प्रयत्न करू असे पडस्थळ च्या सरपंच पदी सौ वैशालीताई पांडुरंग मारकड व सदस्यपदी रेश्माताई महेंद्र रेडके यांचा तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पांडुरंग मारकड यांनी आश्वासित केले.
तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने पडस्थळ ग्रामपंचायतच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सौ वैशालीताई मारकड व रेश्माताई रेडके यांचा सत्कार तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने संस्थापक अध्यक्षा अनिता खरात,गणेश शिंगाडे ,लक्ष्मण वाघमोडे ,हनुमंत यमगर,गोकुळ कोकरे, सद्दाम बागवान,सुधीर पाडूले,नानासाहेब खरात,यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी अनिता खरात म्हणाल्या की, वैशालीताई व रेश्माताई या कृषी उत्पन्न मार्केट समितीचे सभापती पांडुरंग मारकड व कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात पडस्थळ ग्रामपंचायत विकासाच्या बाबतीत एक नंबर वरती नेहतील अशी आम्हाला आशा आहे.कारण पांडुरंग मारकड व महेंद्र रेडके यांचे काम हे सर्व समाजाला व सर्वपक्षीय लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे असते आणि त्यांनी नेहमीच जनसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या व युवक वर्ग विद्यार्थी यांच्या कामाला प्रधान्य दिले आहे आणि हीच प्रेरणा घेऊन वैशालीताई व रेश्माताई आपल्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढील काळात पडस्थळ ग्रामपंचायत आदर्शवत ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला आणतील यात काही शंका नाही.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पांडुरंग मारकड म्हणाले की, सर्वांना बरोबर घेऊन पडस्थळ ग्रामपंचायत ही ग्रामपंचायत तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात एक नंबर करण्याचा प्रयत्न करू.

