shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठी भाषिक कवी /कवयत्रींसाठी आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धा


श्रीरामपूर: - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघ आपल्या लौकिकाप्रमाणे साहित्यीकांना एक आंतरराष्ट्रीय व्यासपिठ व सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने एक नवीन प्रकल्प घेऊन येत आहे. या द्वारे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील मराठी भाषिक साहित्यीकांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करण्यात येत आहे. जेणे करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी तरी मराठीला राजभाषेचा अभिजात दर्जा मिळावा.

            या सर्व धामधुमीत डब्ल्यूसीपीए मराठी भाषिक साहित्यीकांसाठी घेऊन येत आहे "आई " या विषयावरील कवितांसाठी

" वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पोएट्री अवॉर्ड २०२३ "
          तरी साहित्यीकांनी फक्त " आई " या विषयावरील आपली एक स्वरचित व टाईप केलेली कविता wcpashrirampur@gmail.com या मेल आयडीवर पाठवायची आहे. सोबत नव्याने काढलेला ऑफिसिएल पासपोर्ट फोटो पाठवावा. यातील पहिल्या पाच विजेत्यांना " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पोएट्री अवॉर्ड २०२३ " देऊन सन्मानीत करण्यात येईल. तसेच सोबत वर्ल्ड पार्लमेंटची लाईफ टाईम मेंबरशीप देण्यात येणार आहे.
           तसेच सर्वच सहभागी कवींच्या कविता " महामाय " या जगातील सर्वात मोठया व गिनिज बुकात नोंद होणाऱ्या काव्यखंडात छापल्या जाणार आहेत.
या विश्वविक्रमी काव्यखंडाचे प्रकाशन अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.तरी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आपल्या कविता सोबत दिलेल्या मेल आयडीवर पाठवायचे आहे. कोणत्याही व्हॉटसपवर कविता पाठवू नये. कविता लिहीताना मर्यादांची जाणीव काळजीपूर्वक ठेवावी. फापडपसारा कविता नसाव्यात.

      विशेष म्हणजे यासाठी कुठलेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाहीत. तसेच यापूर्वी सहभागी घेतेलेले कवी / कवयत्री पुन्हा भाग घेऊ शकतात. याच बरोबर सदर स्पर्धे संदर्भातील वृत्त अनेक इच्छुक कवी / कवयत्रींपर्यंत पोहचवावे असे आवाहन डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे.
close