शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
राजकीय बातमी
करंजी गावात रस्ते खूप बिकट आहे त्या रस्त्याला चांगला निधी देऊन करंजी गावातील लोकांच्या समस्या दूर कराव्या यासाठी करंजी गावचे उपसरपंच शिवाजी जाधव तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे अ.नगर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे शिवसेना नेते लक्ष्मण भिंगारे, संजय उगले, प्रहार कार्यकर्ते रोहित कदम बापू कदम. यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली व त्यांना रस्त्याचे निवेदन दिले, त्याच प्रमाणे कोपरगाव तालुक्यात गेल्या सात वर्षांपासून गटशिक्षण अधिकारी नाही गटशिक्षण अधिकारी लवकरात लवकर कोपरगाव तालुक्यातील शिक्षण खात्याला मिळावे असे निवेदन व मागणी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिले.
त्याच प्रमाणे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली मंत्रालय मधी जाऊन करंजी गावचे सचिव किरण शिंदे यांची भेट घेतली व गावसाठी रताचे काम मिळवण्यासाठी मंत्रालय मधी वेळोवेळी मदत करावी अशी मागणी केली, त्याच प्रमाणे मुख्यमंत्री यांच्या कार्यालय मधी जाऊन करंजी ते पढेगाव हा तीन किलोमीटर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बसवावा, मुंबई येथे कोपरगाव चे आमदार आशुतोष काळे साहेब यांचे स्विय सहायक माने साहेब यांची भेट घेऊन जवळ घेऊन गेलेले काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू,असे आश्वासन दिले, करंजी गवासाठी विकास निधी हा आमदार साहेबांच्या निधीतून घेता येईल अशी आमदार आशुतोष काळे साहेब यांनी सांगितले, तसेच माने यांना पत्र दिले व त्याचा पाठपुरावा हा वेळोवेळी करण्यात येईल.
जनतेने पाच वर्ष ज्या कामासाठी निवडून दिले ते काम करणे हा एकच ध्यास घेऊन काम करणे, आपल्यावर ज्या लोकांनी विश्वास ठेऊन नी निवडून दिले त्या लोकांचा विश्वास तोडायचा नाही आणि ज्या लोकांनी विश्वास ठेवला नाही त्यांचा विश्वास कामामधून प्राप्त करायचा हेच धोरण ठेवायचे, कामात अडचणी येणार असतात त्यावर मात करून पुढे जायचे, हाच विचार मनात ठेऊन काम करायचे आसे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे पाटील यानी व्यक्त केले.

