shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पृथ्वीराज मुळीक ची भारतीय सैन्यदलामध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती

पृथ्वीराज मुळीक ची भारतीय सैन्यदलामध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती
 इंदापूर - लासुर्णेः  लासुर्णे(ता. इंदापूर ) येथील कर्दनवाडी सारख्या ग्रामीण भागातून पृथ्वीराज मुळीक याची भारतीय सैन्य दलाने घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. कर्दनवाडी सारख्या ग्रामीण भागातील पृथ्वीराज सैन्यदलामध्ये सुपर क्लासवन ऑफिसर झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी बनणे हे लाखो तरुणांचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परीक्षेचे अनेक टप्पे पार करावे लागतात. सर्वात आधी उमेदवारांना एनडीए (NDA) सारख्या प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात, त्यानंतर एसएसबी (SSB) मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीच्या आव्हानाला सामोरे जावे लागते. हे सर्व टप्पे पार केल्यानंतरच उमेदवारांची लष्करी प्रशिक्षणासाठी निवड होते.
 पृथ्वीराज मुळीक चे प्राथमिक शिक्षक श्री वेंकटेश्वरा इंग्लिश मीडियम स्कूल कळंब-वालचंदनगर येथे झाले आहे. तर माध्यमिक शिक्षण हे सातारा सैनिक स्कूल येथे झाले आहे.

पृथ्वीराज ची सुरुवातीपासूनच सैन्य दलामध्ये काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने तो दहावीत असतांनाच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. याच स्पर्धा परीक्षामार्फत लेफ्टनंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. 

पृथ्वीराज मुळीक याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सैन्यदलातील मुख्य परीक्षेसाठी देशातून पाच ते सहा लाख विद्यार्थी बसले होते. यामधील वीस हजार विद्यार्थी परीक्षेस पात्र झाले. पुढे हे सर्व विद्यार्थी 'मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स'ने आयोजित केलेल्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) साठी बोलवले होते. यामध्ये फक्त १३४ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले. परंतु फक्त ९० उमेदवारांची मागणी असल्याकारणाने देशांतर्गत फक्त ९० विद्यार्थ्यांची निवड झाली.पृथ्वीराज व त्याचे वडील पोपटराव मुळीक यांची सुरुवातीपासूनच सैन्यदलामध्ये जाऊन देश सेवा करण्याची इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छा पृथ्वीराज याने पूर्ण केल्याने संपूर्ण मुळीक परिवाराने समाधान व्यक्त केले.
close