shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एल. जी. बनसुडे विद्यालयात स्व. अजित (दादा) पवार यांची जयंती साजरी

एल. जी. बनसुडे विद्यालयात स्व. अजित (दादा) पवार यांची जयंती साजरी
पळसदेव (ता. इंदापूर): महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एल. जी. बनसुडे इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पळसदेव येथे स्वर्गीय अजित (दादा) अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्व. अजित (दादा) पवार यांनी सार्वजनिक जीवनात विकासाभिमुख व लोकहिताच्या कार्यातून आपला वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. शितलकुमार शहा, विद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय इंगोले, मुख्याध्यापिका सौ. सीमा बाराते, उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात स्व. अजित (दादा) पवार यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले. शासनाच्या परिपत्रकानुसार विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
close