shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बिजवडी आरोग्य केंद्राचे 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' उपक्रमाला कालठणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद!जिल्हा परिषद सदस्य यशराज जगदाळे व डॉ. गणराज चौगुले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

बिजवडी आरोग्य केंद्राचे 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' उपक्रमाला कालठणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद!

जिल्हा परिषद सदस्य यशराज जगदाळे व डॉ. गणराज चौगुले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
इंदापूर / कालठण :
प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी (ता. इंदापूर, जि. पुणे) अंतर्गत 'आयुष्मान आरोग्य मंदिर' कालठण नं. १ येथे 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन व मार्गदर्शन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. यशराजजी जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. गणराज चौगुले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.

"ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिक निरोगी आणि सुदृढ राहणे हीच खऱ्या अर्थाने गावाची प्रगती आहे. 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' या मोहिमेच्या माध्यमातून शासकीय आरोग्य सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचत आहेत. नागरिकांनी या योजनांचा आणि तपासणी शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा," 
_ श्री.यशराज जगदाळे ( जि. प. सदस्य पुणे)

विविध आरोग्य तपासण्या आणि मार्गदर्शन
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व वैद्यकीय अधिकारी डॉ. गणराज चौगुले यांनी ग्रामस्थांना बदलती जीवनशैली आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी ग्रामस्थांना आरोग्य संवर्धन, रोगप्रतिबंधक उपाययोजना, नियमित आरोग्य तपासणी, माता व बाल आरोग्य, स्वच्छता तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करून गावाला आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
शिबिरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. एकूण १५३ रुग्णांची ओपीडी करण्यात आली. त्यापैकी ५३ ईसीजी तपासण्या, ८७ डोळ्यांच्या तपासण्या, १३ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड, ५२ नागरिकांची रक्तदाब व रक्तातील साखर (बीपी व शुगर) तपासणी, तसेच ११२ नागरिकांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय पॅलिएटिव्ह केअर अंतर्गत ३ रुग्णांना त्यांच्या घरी जाऊन आरोग्यसेवा देण्यात आली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ,वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रगती करे, देवेंद्र उत्तेकर, दत्तात्रय झगडे, कमल पांचाळ, रोहिणी म्हेत्रे, सुषमा जाधव, आशा पतंगे, इब्रहिम मकानदार, श्याम कांबळे, तानाजी कांबळे, मजर मुलाणी, दादा कट्टी, प्रतीक लोंढे, अतुल तोंडे, शिवाजी गोळे, संदीप रायपुरे, प्रवीण पोंदकुले,सोनाली यादव, आशा स्वयसेविका सह कालठण नं. १ मधील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, तरुण मंडळ, महिला भगिनी,अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आरोग्य विभागाच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल कालठण परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाचे आभार मानले आहेत.
close