shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोमवार पासून निर- निमगाव येथील सद्गुरु श्री संत बाळूमामा वार्षिक भंडारा उत्सवाला होणार सुरुवात.

सोमवार पासून  निर- निमगाव येथील सद्गुरु श्री संत बाळूमामा वार्षिक भंडारा उत्सवाला होणार  सुरुवात.

 दि. २०, २१, २२ या तीन दिवस चालणार धार्मिक व पारंपारिक कार्यक्रमाचे भंडारा उत्सवानिमित्त आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथील सद्गुरु श्री संत बाळूमामा देवस्थान भंडारा वार्षिक उत्सवाला सोमवार दि.२० वीस मार्च २०२३ रोजी पासून सुरुवात होत आहे. या उत्सवात धार्मिक तसेच पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या भंडारा उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री संत बाळूमामा बग्गा नं. १५ आदमापूर, कोल्हापूर यावरून मेंढ्यांचा कळप या भंडार्यासाठी दि. १७ मार्च २०२३ रोजी शुक्रवारी उपस्थित झाली आहेत .या भंडारा उत्सवामध्ये सोमवार दि. २० मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ८ वाजता शाहीर ठकसेन शिंदे, शाहीर काकासाहेब निकम, शाहीर रामदास गुंड, शाहीर बळवंत चौगुले यांचा चौरंगी  जंगी सामना होणार आहे .तसेच त्याच दिवशी  अण्णासाहेब भगवानराव वावरे यांचा महाप्रसाद असणार आहे.
 दि. २१ मार्च २०२३ वार मंगळवार रोजी संध्याकाळी ठीक ८ वाजता शाहीर  अनिल गडदे महाराज सांगली  यांचा बाळूमामाच्या धनगरी ओव्यांचा कार्यक्रम असणार आहे.
 त्याच दिवसी  रणजीत  दत्ताजीराव घोगरे यांचा महाप्रसाद असणार आहे.
 दिनांक २२ मार्च २०२३ रोजी बुधवारी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बाळूमामाच्या पालखीची भव्य मिरवणूक सायंकाळी ४ वाजता निघणार आहे. संध्याकाळी ठीक ८ वाजता ह भ प  विक्रम जगताप (मेजर) महाराज यांचा बाळूमामाच्या चरित्रावर संगीतमय प्रवचन होणार आहे. त्या दिवशी दिपक बजरंग जाधव यांचा महाप्रसाद असणार आहे. भंडारा उत्सवासाठी आलेल्या बाळूमामाच्या बग्गा नं. १५ च्या सर्व सेवकांचे कारभाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात येणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या वार्षिक भंडारा उत्सवामध्ये सहभागी व्हावे असे सद्गुरू श्री संत बाळूमामा भक्त परिवार व समस्त ग्रामस्थ निर निमगाव त्यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
close