रासप युवक आघाडीच्या वतीने विज बिल कमी करून विज बिल वितरित करा म्हणून दिले निवेदन पत्र.
पंधरा दिवसांमध्ये बिल कमी करून विज बिल वितरित न केल्यास कार्यालयासमोर चक्रीय उपोषणाचा दिला इशारा.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १७ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर युवक आघाडीच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज बिल त्वरित कमी करण्याबाबत उप अभियंता महाराष्ट्र राज्य महावितरण महामंडळ कार्यालय जंक्शन नावे येथील अधिकारी शेख यांना दिले निवेदन पत्र....
यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडी सरचिटणीस सागर दादा देवकाते, राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडी इंदापूर तालुकाध्यक्ष आकाश पवार,राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते राजेंद्र देवकाते , राष्ट्रीय समाज पक्षाचे कळंब गावाचे युवा नेते विनोद रूपनवर उपस्थित होते.
सदर निवेदन पत्रात म्हटले आहे की, शेतकरी व्यापारी गाळेधारक छोटे व्यापारी कमर्शियल घरगुती वीज बिलमापक दरामध्ये देऊन मागील वर्षापासूनचे थकीत बिल किंवा चालू च्या वीज अभिलेख त्वरित कमी करावी नवीन वीज बिल महावितरण ने तयार करून ते वाटप करण्यात यावी अशी नम्र विनंती करून पुढील पंधरा दिवसांमध्ये बिल कमी करून विज बिल वितरित न केल्यास आपल्या कार्यालयासमोर चक्रीय उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन पत्र देण्यात आले.
अधिक माहिती युवक अध्यक्ष आकाश पवार यांनी देताना म्हटले आहे की, निवेदन पत्र शेख साहेब यांना देताना शेख यांनी माहिती दिली की, उप अभियंता सूळ यांच्याशी चर्चा करून विज बिल कमी करण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल.

