shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सर्रासपणे चालु गावठी दारु,मटका,जुगार !त्यावर मेहकर बनले अवैध गुटख्याचे आगार !!

*गुटखा बंदी अधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

*जिल्ह्यात इतर ठिकाणी कारवाई
मग नेमके मेहकरमध्ये का नाही ?

 *स्थानिक गुन्हे शाखेचे देखील
मेहकरकडे का होत आहे दुर्लक्ष ?

 *शहरासह  ग्रामीण भागात सर्व
ठिकाणी अवैध गुटख्याची विक्री
युवा वर्ग होत आहे व्यसनाधीन

 *गुटका बंदी असतानाही खुले
आम गुटखा विक्री होतेच कशी?

उध्दव फंगाळ - मेहकर
*मेहकर शहरासह तालुकाभर गावठी दारु,मटका,जुगार आणि अवैध गुटखा विक्रीला मोठा उत आला असुन, स्थानिक पोलिस प्रसासन,गुन्हे अन्वेषण,व गुटखाबंदी अधिकारी मात्र असुनी डोळे पण अंधाळे अशा भुमिकेत असल्याचे दिसून येत आहे.* 
यावर पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालावे अशी जनसामान्यांकडून मागणी होताना दिसून येत आहे
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा विक्री बंद केलेली आहे मात्र शासनाची ही गुटखा बंदी, शासकिय अधिकाऱ्यांच्या जाणिवपूर्वक दुर्लक्षापणामुळे केवळ कागदोपत्रीच दिसत असल्याचे चित्र आहे, मेहकर शहरासह ग्रामीण भागातील डोणगांव, जानेफळ ,सुलतानपूर आदि ठिकाणी खुलेआम सर्रासपणे गुटखा विक्री सुरू आहे, अशा अवैध गुटखा विक्रीमुळे युवा वर्ग व्यसनाधीन होत आहे ठिकठिकाणी गुटख्याच्या पुड्या मोठ्या प्रमाणात मिळत आहेत, जिल्ह्यात इतर ठिकाणी थोड्याफार कारवाया झाल्या आहेत मात्र मेहकर तालुक्यात कारवाई का होत नाही ?,असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून विचारला जात आहे.
 गुटखाबंदी अधिकारी व पोलीस प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने या विभागावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने बंदी घातली असतानाही मेहकर शहरासह तालुक्यात गुटखा येतो कुठून व त्याची ठिकठिकाणी विक्री होतेच कशी ?असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे, मग मेहकरकडे का बरं दुर्लक्ष होत आहे ?, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
अलीकडच्या काळामध्ये युवा वर्ग खुपच व्यसनाधीन होत चाललेला आहे, त्यांचे व्यसन सुटावे,युवा वर्ग निर्व्यसनी व्हावे यासाठी वेगवेगळे मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते हा जरी प्रकार योग्य असला तरी देखील ज्या वस्तूवर शासनाने बंदी घातलेली आहे त्या वस्तू खुलेआम कशा विकल्या जातात ?, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. शासनाने तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे मात्र मेहकर शहरासह तालुक्यातील  डोणगांव,जानेफळ, सुलतानपूर आदी ठिकाणी प्रत्येक हॉटेल, किराणा दुकान,पानपट्टी आदी ठिकाणी गुटख्याच्या पुड्या खुल्याआमपणे विकल्या जात आहेत, होलसेल विक्री करणारे सेलर्स दुचाकीवर खुलेआमपणे गुटख्याच्या पुड्यांचा माल पुरवितात मग हे पोलिसांना किंवा गुटखाबंदी अधिकाऱ्यांना दिसत नाही का ?, बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या कारवाया करण्यात आल्या आहेत ही चांगली बाब आहे, मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे मेहकर विभागाकडे का दुर्लक्ष होत आहे ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

 गुटखा पुड्यांमुळे युवा वर्ग व्यसनाधीन होत असलेला असलातरी शासनाने बंदी घातली असतानाही अवैध गुटखा विक्री होतेच कशी हा चिंतनाचा विषय आहे.
मेहकर शहरात तर प्रत्येक ठिकाणी खुलेआम गुटखा पुड्या विकल्या जात आहेत, याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित होत आहे, मेहकर शहरात विविध शिक्षण संस्था आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेतात शाळेच्या परिसरातही गुटखा पुड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे, दिवसाढवळ्या ही विक्री होत असताना पोलीस व गुटखा बंदी अधिकारी यांना दिसत नाही का ?, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. शासनाच्या प्रतिनिधीकडून अशा अवैध व्यवसायांना अभय मिळत असल्याने शासनाच्या गुटखाबंदीचे तीन तेरा वाजले आहेत.

त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरून मेहकर शहरातील किंवा तालुक्यातील तसेच डोणगांव,जानेफळ,सुलतानपूर येथील अवैध गुटखा विक्री बंद होणार का ?, का पुन्हा जैसे थे परिस्थिती सुरू राहणार ?, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र काही असले तरी शासनाच्या गुटखाबंदीचे मेहकर तालुक्यात तेरा वाजले आहेत एवढे मात्र नक्की अशा प्रकारची जोरदार चर्चा सध्या मेहकर शहरासह तालुक्यात ऐकवयास मिळत आहे.

मेहकर शहरासह तालुकाभर गावठी दारु,मटका,जुगार आणि अवैध गुटखा विक्रीला मोठा उत आला असुन,स्थानिक पोलिस प्रसासन,गुन्हे अन्वेषण,व गुटखाबंदी अधिकारी मात्र असुनी डोळे पण अंधाळे अशा भुमिकेत असल्याचे दिसून येत आहे.
यावर पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालावे अशी जनसामान्यांकडून मागणी होताना दिसून येत आहे.

पत्रकार उध्दव फंगाळ

close