मौजे पडस्थळ येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास प्रारंभ
कल्याण पवार व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ पडस्थळ यांनी केले आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक १५ मार्च २०२३ रोजी पडस्थळ येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत ग्रंथ पारायण सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. व्यासपीठ चालक मोहन महाराज वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पडस्थळ मधील भजनी मंडळी व वारकऱ्यांच्या समवेत विणा पूजन करण्यात आले. पडस्थळच्या विद्यमान सरपंच वैशालीताई मारकड व पांडुरंग मारकड यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीची पूजा करून सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सुग्रीव बोंगाणे, बळीराम बोंगाणे, रामचंद्र बोंगाणे, महेंद्र रेडके, नवनाथ कोळेकर, राजेंद्र बोंगाणे, अर्जुन रेडके, चंद्रकांत बोंगाणे यांच्या उपस्थितीत पार पडले.
सदर सोहळ्याचे हे पाचवे वर्ष असून दिनांक १५ मार्च २०२३ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार आहे. ह. भ. प विठ्ठल महाराज वासकर,(पंढरपूर) गुरुवर्य परमेश्वर महाराज जायभाये,(आळंदी) ह.भ. प ज्ञानेश्वर महाराज कदम (मोठे माऊली), गुरुवर्य माऊली महाराज मुढेकर (गंगाखेड) या ज्ञानीजनांची कीर्तन सेवा आपणास श्रवण करण्यास मिळणार आहे. तर काल्याचे किर्तन ह. भ. प मनीषानंद पुरी जी महाराज (परभणी) यांचे होणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक श्री राम महाराज काजळे, पंडित श्री दासोपंत स्वामी,आळंदीकर व इतर मृदंग वादक या कीर्तनामध्ये आपली उपस्थिती लावणार आहेत. तरी पंचक्रोशीतील सर्वांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हरिनाम सप्ताहाचे आयोजक कल्याणभाऊ पवार यांनी केले आहे. रोज रात्री ९ ते ११ या वेळेत ही कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.

