मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच रहाणार - जिल्हा सचिव संतोष कानडे
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १५ / राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांचे निर्देशानुसार अहमदनगर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचा
मंगळवार दि .१४ मार्च २०२३ पासून महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर सेवकांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू झाला . यावेळी कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणुन गेला .
सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करून सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे , सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०:२०:३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्याना लागू करणे तसेच सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचार्याना सातवा वेतन आयोग लागु करून विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कार्माच्याऱ्यांना जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे तसेच विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्याची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे तसेच २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कार्मच्यार्याना जुनी पेंशन लागू करणे, विद्यापीठीय शिक्षकेत्तर कार्मच्यार्याांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे आदी मागण्या शासन दरबारी मान्य होणेसाठी हा संप पुकारण्यात आला असल्याचे अहमदनगर जिल्हा सचिव श्री .संतोष कानडे यांनी सांगितले .
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नगर शहरातील न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी, रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, लॉ कॉलेज शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र बालक मंदिर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या शाखेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत .
यावेळी प्रा. विलास वाळुंजकर प्रा.राजेंद्र जाधव, प्रा. संजय जाजगे, प्रा.आप्पासाहेब पोमणे, प्रा. मोहन कांजवणे, प्रा.भाऊराव नाडेकर, प्रा. अर्चना काळे, प्रा. आरती साबळे, प्रा. दिपाली रक्ताटे, प्रा.प्रतिभा पवार,प्रा.प्रतिमा शेळके,प्रा.अनिता चव्हाण, महाराष्ट्र बालक मंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शेवाळे, नितीन कराळे, , संतोष कानडे, रविंद्र वर्पे, सिताराम मुळे, पी सी म्हस्के , सौ. ए. एस बारगळ , डी. पी. वराट , श्री. ए. बी. गोरे , एन. पी. पाखरे, श्री. दाते ए. डी यांच्यासह अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपात सहभाग घेतला आहे.

