shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नांदेड जिल्हा टीमचे उत्कृष्ट कार्य : युवा अध्यक्ष मारोती झम्पलवाड

किनवट, नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा युवा अध्यक्ष मारोती झम्पलवाड यांनी किनवट येथील प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या कार्यालयास भेट देऊन किनवट तालुका कार्यकारणी व युवा कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पत्रकारांच्या विविध समस्या व अन्य विषयावर संवाद साधला. याप्रसंगी त्यांचे समवेत (बँक मॅनेजर नांदेड, प्रदेश अध्यक्ष गोल गोल्लेवार समाज संघटना) अनुप अन्नमवार, माजी सरपंच शिवाजी बोड्डेवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.

यावेळी झंम्पलवाड म्हणाले की, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे,  मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात भक्कमपणे सुरू असून नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संघटनेचे कार्य उत्कृष्टपणे सुरू असल्याचे प्रतिपादन केले. प्रत्येक तालुक्यात प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाची कार्यकारिणी असून प्रत्येक कार्यकारणी उत्कृष्ट काम करत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पत्रकार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाला जोडले जात आहेत.
 याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार  मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, तालुका अध्यक्ष नसीर तगाले, कार्यकारणी सल्लागार विलास सूर्यवंशी, युवा तालुका अध्यक्ष प्रणय कोवे, युवा प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके, तालुका सदस्य इंद्रपाल कांबळे, ज्येष्ठ पत्रकार जयवंत कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
close