shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सा.बां.खात्यातील भ्रष्टाचाराबाबत कु.सुनिता रणधिर यांच्यासह महिला कार्यकर्त्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण..!

शौकतभाई शेख
मुंबई - येथील मुंबई (मध्य) सा.बां.विभागातील अपहाराबाबाबत सरसकट गुन्हे दाखल व्हावे तथा उत्तर मुंबई सा.बां. विभागातील कार्यकारी अभियंत्यांना पदावनत करत शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी याकरीता सुनिताताई रणधिर आणि असंख्य कार्यकर्त्यांकडून मुंबई येथील आझाद मैदानावर अंखड बेमुदत उपोषण छेडण्यात आले आहे.

हल्ली बहुतांश शासकीय कार्यालयात काही शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना कोणाचाच धाक राहिलेला नाही,मनाला वाटेल तसे ते गैरकारभार करु लागले आहे,शासनाच्या संपत्तीला जणू आपलीच संपती समजून गैरमार्गाने स्वतःच्या तिजोऱ्या भरु लागले आहेत, अशा गैरकारभारी आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी समस्त जागरुक नागरिकांनी पुढे आले पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून सदरील उपोषणाद्वारे संबधित अधिकाऱ्यांचा गैरकारभार शासनाच्या निदर्शनास यावा याकरीता उपोषणाचा मार्ग स्विकारला गेला आहे,

मध्य मुंबई (सा.बां.) विभाग वरळी मुंबई या कार्यालयात झालेल्या अपहराबाबत वरळी पोलिस ठाणे येथे दाखल भा.द.वि. ४२०,३४ प्रमाणे गुन्ह्यातील सर्व अधिका-यांवर सरसकट गुन्हा दाखल करुन कार्यवाही करावी. तसेच  सचिन केरु धात्रक - कार्यकारी अभियंता उत्तर मुंबई सा.बां.विभाग अंधेरी (प) मुंबई  यांना तत्काळ पदावनत (DEMOTED) करुन त्यांचेवर त्वरीत शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशा या मागणीसाठी कु.सुनिता सुभाष रणधिर (संपादिका - महाराष्ट्र ऑफिसर) यांचेसह त्यांचे असंख्य महिला कार्यकर्ते यांच्या समवेत आज दि १५/०३/२०२३ पासुन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अखंड उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. आज उपोषणाचा १ ला दिवस असुन या गुन्ह्यातील सर्व भ्रष्टाचारी अधिका-यांवर त्वरीत कारवाई होत नाही. तो पर्यत हे उपोषण चालुच राहील असे कु.सुनिता रणधिर यांनी सांगितले आहे.

close