shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत घोरपडे

हर्षवर्धन पाटील विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत घोरपडे 
इंदापूर : प्रतिनिधी दि.17/3/23
                     घोरपडवाडी येथील हर्षवर्धन पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची अध्यक्षपदी सूर्यकांत उर्फ बाळासाहेब शंकरराव घोरपडे व उपाध्यक्षपदी सदाशिव जनार्दन भिटे यांची बुधवारी (दि.१५) बिनविरोध कारण्यात आली. 
      या संस्थेच्या सन 2023 ते 2028 करिता संचालक म्हणून वर्षा घोरपडे, हेमा घोरपडे, अलका घोरपडे, उज्वला भगत, रूपाली शिंदे, भामाबाई नाचण, रामचंद्र गोरे, बापूराव माने, साहिल घोरपडे, दिलीप लावंड, मधुकर आंधळकर, दिलीप माने, बाबा गेजगे यांची बिनविरोध निवड झाली. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीसाठी संचालक मंडळाच्या आयोजित बैठकीत सूर्यकांत उर्फ बाळासाहेब घोरपडे व सदाशिव भिटे यांचे एकमेव अर्ज आल्याने, त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी पी. व्ही. हराळ केली. नूतन संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्षांचे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी अभिनंदन केले.

close