shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुस्ती क्षेत्रात इंदापूर तालुक्याच्या नावलौकिक वाढवावा - भाजपा नेते हर्षवर्धन पाटील.

कुस्ती क्षेत्रात इंदापूर तालुक्याच्या नावलौकिक वाढवावा - भाजपा नेते हर्षवर्धन पाटील.

राजवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काझडमध्ये भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान संपन्न*

   - माजी मंत्री, भाजपा नेते हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांची यावेळी उपस्थिती 
  इंदापूर प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टी काझड तसेच नाथा पाटील व  तुषार ठोंबरे मित्र परिवाराच्या वतीने निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काझड येथे दि.18 रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.
    माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी भेट देऊन कुस्ती आखाड्याचे उद्घाटन केले व सर्व कुस्ती प्रेमींना शुभेच्छा दिल्या. 

कुस्तीप्रेमी इंदापूर तालुका असून कुस्ती क्षेत्रात इंदापूर तालुक्याच्या नावलौकिक वाढवावा असे आवाहन यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
    
   यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष  शरद जामदार, पै. नितीन काका माने, भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया अध्यक्ष साहेबराव पिसाळ, श्रीरंग शिंदे,अर्जुन नरूटे, शिवाजी नरूटे, नितीन झगडे, शंकर वीर, रामदास नरूटे, सुरेश पांढरे, सावता बोराटे, राम चव्हाण सर, दीपक झगडे, व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
close