गडीच्या संवर्धन संदर्भात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून काम करू - आमदार दत्तात्रय भरणे.
शिवभक्त मित्रपरिवार व इंदापूर तालुक्याच्या वतीने आ.दत्तात्रय भरणे यांचा सन्मान .
इंदापूर प्रतिनिधी : - इंदापूर तालुक्यातील मालोजीराजे यांच्या गढीसंवर्धनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करून जुनी कचेरी पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले म्हणून आ.दत्तात्रय भरणे यांचे मालोजीराजे चौक बायपास रोड या ठिकाणी या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या समयी शिवभक्त परीवार व इंदापूर शहर वाशियांच्या वतीने हलगी च्या , तुतारीच्या सदाबहार निनादात व फटाके फोडून पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारडकर शिवभक्त परिवाराचे व जिजाऊ जयंतीचे प्रणेते बापूसाहेब जामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, प्रतापराव पाटील, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस ,मा.नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे,राजेश शिंदे मा.उपनगराध्यक्ष, महादेव सोमवंशी शहर प्रमुख शिवसेना, छायाताई पडळकर, सचिन खामगळ, सागर पवार,ओंकार शरद सरडे, विद्यार्थ्यी रा. काॅ. शहराध्यक्ष, हमिदभाईआतार सह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की
मालोजीराजे भोसले यांच्या गढी संवर्धनासाठी पर्यटन विभागामार्फत 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. तसेच येत्या 2 महिन्यांच्या आत ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात येईल. या ठिकाणची, वास्तूची देखभाल ज्या विभागाकडे असेल त्यांच्या समन्वयाने तेथील अतिक्रमणे काढण्यात येतील. यासाठी लवकरच पर्यटन, सांस्कृतिक कार्य, महसूल आणि गृह विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, हे फक्त आहे अजून बराचसा निधी येणे बाकी आहे, आमदार म्हणून माझे थांबायचे ही तयार आहे पण गडीच्या संवर्धन संदर्भात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून काम करू, सर्वच पक्षाच्या लोकांनी यामध्ये सहकार्य करावे, शांत डोक्याने मनापासून गडी संवर्धनाचे काम व्यवस्थित मला करू द्या, आसे मत
आ.दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर बोलताना म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी राजे यांच्या कंकर गढीसंवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ घोषित करा, असी लक्षवेधी विधानसभेत मांडली.होती
सदस्य म्हणून दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे स्मारक तसेच मालोजी राजेंच्या पादुकांसाठी दगडी मूळ स्वरुपाचा चबुतरा उभारण्यात यावे, याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. , छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी वास्तव्य केलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील कंकर गडी महसूल विभागाकडे आहे. महसूल विभागाच्या नोदींत मालोजीराजांच्या इतिहासाच्या बाबींचा उल्लेख आहे. इतिहासाची साक्ष असणाऱ्या या ऐतिहासिक जुनी तहसील कचेरी म्हणजेच मालोजीराजे यांच्या गढीचे संवर्धन करुन जुने बुरुज, गाव, वेस यांचे पुनरुज्जीवन करुन या कचेरीच्या जागेतच मालोजीराजे भोसले यांचे स्मारक उभारण्यात येईल.हे इंदापूर शहराचे सौंदर्य वाढवेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केले .
तसेच या वेळी बापूराव जामदार यांनी आ.दत्तात्रय भरणे यांचा शाही थाटात, फेटा,भगवी शाॅल,फुलांचा भव्य गुच्छ देऊन शिवभक्त परीवाराच्या वतीने आ.दत्तात्रय भरणे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना बापू जामदार म्हणाले की, दत्तात्रय मामा भरणे यांनी विधान सभेत लक्षवेधी सूचना मांडली होती अगोदर सूचना देऊन मेल केला होता त्यांचं श्रेय इतरांनी घेऊ नये निवडणुका आले की मालोजी राजेंची गडी छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा भार्गवराव तळ्यातील सुशोभीकरण याची आठवण काही नेतेमंडळींना आल्याशिवाय राहत नाही. किती दिवस जनतेला उल्लू बनवणार मिटींगला घेणे आता तरी बंद करावेत .कारण दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील मालोजीराजे गडी संवर्धनासाठी लक्षवेधी मांडून तालुक्यासाठी गडी संवर्धनाचा प्रस्ताव मांडला आणि पर्यटनमंत्र्यांनी त्यास आराखड्या साठी मंजुरी दिली,आ.दत्तात्रय भरणे खरेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिलेदार, आहेत म्हणून इंदापूर तालुक्यातील जनता तुमच्या मागे ठाम आसे मत बापूराव जामदार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी केले.

