shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवक्रांती वडार फॉउंडेशन चे शिष्टमंडळाने कै. पैलवान मारुती चव्हाण (वडार)* यांच्या निवास स्थानी त्यांच्या कुटुंबियांची घेतली सदिच्छा भेट .

 शिवक्रांती वडार फॉउंडेशन चे शिष्टमंडळाने 
कै. पैलवान मारुती चव्हाण (वडार)* यांच्या निवास स्थानी त्यांच्या कुटुंबियांची घेतली सदिच्छा भेट .
शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधी: शिवक्रांती वडार फॉउंडेशन चे शिष्टमंडळ व विविध जिल्ह्यातील पदाधिकारी हे *वडार समाजाचे जागतिक कीर्तीचे कुस्तीपट्टू आणि मल्ल कै. पैलवान मारुती चव्हाण (वडार)* यांच्या निवास स्थानी त्यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. कै. मारुती वडार यांचे दोन सुपुत्र श्री.प्रमोद मारूती चव्हाण (वडार) आणि श्री.सुनिल मारुती चव्हाण (वडार) यांची सदिच्छा भेट *शिवक्रांती वडार फॉउंडेशन* च्या पदाधिकारी यांनी घेतली.
यांचवेळी औसा विधासभेचे आमदार आणि वडार समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाच्या उभारणीसाठी ज्यांनी यशस्वी प्रयत्न केले असे *श्री अभिमन्यू पवार साहेब* यांनीही यावेळी फॉउंडेशनचे अध्यक्ष श्री रवी शिंदे यांच्या फोन वर व्हिडीओ कॉल करून *कै. मारुती चव्हाण (वडार)* यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि विचारणा केली.
नुकतेच विद्यमान महाराष्ट्र शासनाने वडार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली. या आर्थिक विकास महामंडळाला कै. मारुती चव्हाण (वडार) यांचे नाव देण्यात आलेले आहे. शिवक्रांती वडार फॉउंडेशन ने शासनाच्या या निर्णयाचे स्वागत या आधीच केलेले आहे परंतु *वडार समाजाचे आदरणीय प्रेरणास्थान असलेले कै. मारुती चव्हाण (वडार)* यांच्या विषयी आणि त्यांच्या इतिहासाविषयीं, कर्तृत्वाविषयीं, कुटुंबियांची यावेळेस त्यांनी माहिती घेण्याचे ठरवले , त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला आणि म्हणूनच त्यांच्या जन्मभूमीला भेट देण्याचे ठरवले. 
शिवक्रांती वडार फॉउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री रवी शिंदे यावेळी सांगितले की "आदरणीय कै. मारुती चव्हाण (वडार) यांच्या कुटुंबियांची आम्ही भेटली कारण ते वडार समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. अशा प्रेरणादायी व्यक्ती विषयीचे कर्तृत्व त्यांच्या कुटुंबियांकडून आम्हाला जाणून घ्यायचे होते. तसेच शिवक्रांती कडून पै. मारुती चव्हाण (वडार) यांच्याविषयींचे चरित्रात्मक एक पुस्तकही लवकरच प्रकाशित करणार आहोत. आज या पावन भूमीत येऊन आम्ही सर्वजण धन्य झालोत. कै. मारुती चव्हाण (वडार) यांचा आशीर्वाद आम्हास समाजकार्यासाठी लाभला आहे आणि इथून पुढे उस्फूरतपणे आम्ही समाजासाठी चांगले कार्य करू "

यावेळी शिवक्रांती वडार फॉउंडेशन चे संस्थापक सचिव श्री अनिल शेलार बोलले की " आम्ही अनेक वर्षांपासून वडार समाजाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वप्रथम घेऊन जाणारे *पैलवान आदरणीय कै. मारुती चव्हाण (वडार)* यांच्याविषयीं ऐकून होतो परंतु आज आमचे जणू काय स्वप्न पूर्ण झाले आणि त्यांच्या जन्मभूमीत येण्याचे, त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याचे पुण्य लाभले"


 यावेळी *शिवक्रांती वडार फाउंडेशन* चे संस्थापक कार्याध्यक्ष श्री बलराज अण्णा वारकर बोलताना म्हणाले की "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये शिवरायांचे बांधकाम प्रमुख हिरोजी ईटळकर यांच्यानंतर वडार समाजाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणी नाव केले असेल ते म्हणजे कै. मारुती चव्हाण (वडार) यांनी होय. आज आम्ही आमच्या या प्रेरणास्थान असलेल्या पावन भूमीला येऊन धन्य झालो आहोत"

 शिव क्रांती वडार फाउंडेशनचे संस्थापक खजिनदार श्री राजू जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले की "पुन्हा एकदा वडार समाजाचा दैदिप्यमान असा इतिहास जागर झाला आहे. आज आमचे प्रेरणास्थान कैलासवासी मारुती चव्हाण (वडार) यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आम्हाला साक्षात कै. मारुती वडार भेटले असे वाटले"

यावेळी शिवक्रांती वडार फॉउंडेशन चे उपस्थित सर्व वडार बांधव
श्री रविभाऊ शिंदे (प्रदेश अध्यक्ष), श्री मोहन पवार (नगरसेवक - जामखेड), श्री बलराज वारकर (प्रदेश कार्याध्यक्ष), श्री अनिल शेलार (प्रदेश सचिव), श्री राजु जाधव (प्रदेश कोषाध्यक्ष),श्री सदाशिव जाधव (प्रदेश उपाध्यक्ष), श्री शंकर माने (प्रदेश संपर्क प्रमुख ), श्री धोंडीराम शिंदे (उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष), श्री अजय धोत्रेi (कोल्हापुर जिल्हाध्यक्ष), श्री सुरज पवार, श्री विजय जाधव, श्री बिट्टू गायकवाड, श्री विजय कुऱ्हाडे, श्री श्रीकांत सावंत, श्री आनंद सावंत, श्री दीपक नान शिंदे व अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
close