श्रीरामपूर प्रतिनिधी:
हल्ली विविध सेवाभावी सामाजिक घटनांच्या माध्यमातून समाजकार्य होतच आहे मात्र अशाच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विविध समविचारी सेवाभावी संघटना एकत्र आल्यास सामाजिक कार्यास अधिक बळ प्राप्त होऊ शकेल असे प्रतिपादन स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांनी केले.येथील समता कार्यालयात झालेल्या विविध संघटना पदाधिकाऱ्यांच्या छोटेखानी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी समता फाऊंडेशनचे सचिव ॲड.मोहसिन शेख,मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे, प्रदेशाध्यक्ष ॲड.बशीरभाई भुरे, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख अजित गाढे, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती आधिकार संघटनेचे मुख्य महासचिव कमलेश शेवाळे (देवा), प्रदेश संघटक संतोष जावळे, संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हाध्यक्ष मजनुभाई पठाण, महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघाचे सलिमभाई शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शब्बीर शेख संपादित वृक्ष संवर्धन या वर्तमानपत्राचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पुढे बोलताना श्री.शेख म्हणाले की, विविध सेवाभावी संस्था, संघटनांच्या माध्यमातून जनसामान्यांकरीता विविध प्रकारचे सामाजाभिमुख कार्यांसाठी विविध प्रकारचे शिबीरे (कॅम्प) भरवत, जनसामान्यांकरीता विविध सामाजाभिमुख उपक्रम राबवत शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती ही त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कटाक्षाने पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे.
तसेच काही शासकीय कार्यालयात जनसामान्यांची कामे होताना मोठी आडचण निर्माण होते आहे,कागदावर वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकत नाही,अनेकों चकरा मारुन देखील जनसामान्यांची कामे वेळेत पूर्ण होणे मोठे दुरापास्त झाले आहे, यासाठी विविध सेवाभावी संघटनांनी पुढे येणे ही काळाची गरज बनली आहे,यासाठी विविध समविचारी सेवाभावी संस्था, संघटना यांनी एकत्र येत सामाजाभिमुख कार्यांना चालना दिल्यास जनसामान्यांना यातुन मोठा फायदा प्राप्त होऊ शकेल, सोबतच विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र आल्यास संघटनेच्या सभासद व पदाधिकाऱ्यांना कामे करताना आणखी मोठे बळ प्राप्त होऊ शकेल यासोबतच विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचाही समता फाऊंडेशनचे मानस असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यासोबतच देशाच्या जवळपास सहा राज्यात मानव सुरक्षा सेवा संघाची कामे चालतात,संस्थेमध्ये विविध सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचारी आहेत शिवाय दोनशेहून अधिक वकील मंडळी संस्थेशी जोडली गेली आहेत, प्रदेशाध्यक्ष ॲड.बशीरभाई भुरे यांना साधा कॉल जरी केला तर ते तात्काळ अन्यायग्रस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात वेळ प्रसंगी स्पॉटवर देखील धाऊन जात समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतात,असे हाकेला धावून जाणारे मानव सुरक्षा सेवा संघ आहे, म्हणून शौकतभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होत असलेले संघटन समुहाद्वारे नक्कीच उपेक्षित आणि दुर्लक्षितांसोबतच जनसामान्यांकरीता मोठा आधार निर्माण होऊ शकेल असेही ते म्हणाले.
यावेळी स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे महासचिव कमलेश शेवाळे (देवा) म्हणाले की, सेवाभावी संस्था,संघटनांच्या माध्यमातून शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस, पत्रकार,अशा शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबध असावे,संघटना पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे शाब्दिक शत्रृत्व निर्माण होण्यापेक्षा शाब्दिक मित्रत्व प्रस्थापित व्हावे,त्यामुळे जनसामान्यांची कामे करणे अधिक सोपे होते,तथा कामे देखील अधिक जलदगतीने होण्याकामी महत्वाचे ठरते असेही ते म्हणाले.
यावेळी मानव सुरक्षा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड.बशीरभाई भुरे म्हणाले की,ज्याच्या मागे कोणी नाही अथवा ज्याकडे आर्थिक तरतूद नाही अशी माणसे भरडली जाता कामा नये,जर कोणी विनाकारण जनसामान्यांना त्रास देत असेल,शासकीय, निमशासकीय कार्यालयात कुठे त्यावर अन्याय होत असेल,किंवा जाणिवपूर्वक त्याची पिळवणूक केली जात असेल तर जवळच्या मानव सुरक्षा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा ते विनाविलंब मदतीला हमखास धाऊन येतील वेळ प्रसंगी मला कॉल करा मी स्वतः त्याठिकाणी येऊन समस्यांप्रश्नी तोडगा काढून अन्यायग्रस्थास न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करील असेही ते म्हणाले.
यावेळी मानव सुरक्षा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना शौकतभाई शेख यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी मानव सुरक्षा सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शब्बीर शेख, उत्तर महाराष्ट्र सचिव
जावेद शेख,अहमदनगर संघटक
अजिक्य कराळे,श्रीरामपुर तालुकाध्यक्ष तेजस गायकवाड, श्रीरामपुर कार्याध्यक्ष राज चौधरी,
श्रीरामपुर तालुका सचिव नजीर सय्यद,राहुरी तालुकाध्यक्ष सुलेमान शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड.मोहसिन शेख यांनी केले तर जावेद शेख यांनी आभार मानले.

