प्रतिनिधी : महेश चव्हाण
नगर : १६ / एमआयडीसी येथील स्पेशलिस्ट इंटरप्राईजेस लिमिटेड कंपनीमध्ये चोरी करणारे दोन चोरटे पोलिसांनी जरबंद केले असुन ६.५७.२२५/रू किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे .
दि . १३ मार्च रोजी ८:३० वा चे सुमारास राजू लक्ष्मण, रा.रेनाविकर नगर. सावेडी, अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, त्यांचे मालकीची कंपनी स्पेशालिटी इंटरप्राईजेस लि. एमआयडीसी येथून अज्ञात चोरट्याने ८१,७५०/-रू किमतीच्या ३० गोण्या प्लॅस्टिक दाणा प्रत्येकी २५ किलो प्रमाणे वजनाच्या स्वतःचे आर्थिक फायदया करिता चोरून नेल्या आहेत. त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुंरनं २००/२३ भादवी कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सचिन ठकाराम भगत, रा.सुपा ता.पारनेर,२) पवन शंकर जगताप, रा. शेंडी बायपास रोड, मोहिनी नगर, नवनागपूर ता.जि. अहमदनगर यांनी केला आहे अशी माहिती मिळाल्याने सदर आरोपींना पकडण्या करिता एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करण्यात आले. नंतर सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे तपासात कबूल केले आहे. आरोपी नामे सचिन ठकाराम भगत, वय ३६ वर्ष रा.सुपा ता.पारनेर, तसेच पवन शंकर जगताप, वय ३४ वर्षे रा. शेंडी बायपास रोड, मोहिनी नगर, नवनागापूर ता.जि अहमदनगर यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६,५७,२२५/_रू किमतीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला टाटा कंपनीचा टेम्पो नंबर एम.एच.१६.सी.डी.१३२७ जप्त करण्यात आलेल्या आहे. .आरोपीना पोलिस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक , श्री. अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग , त्यांचे मार्गदर्शना खाली सोपनि श्री. राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी ,सफौ रावसाहेब लोखंडे पोहेको संदीप खेगट, पोना मच्छिंद्र पांढरकर, पोना/चांगदेव आंधळे, पोको/किशोर जाधव, पोको सचिन हरदास पथकाने केलेली आहे.

