न्यू आर्टसच्या गेटवर शिक्षणाच्या बाप दादांचा संपाचा चौथा दिवस
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १७ / ' एकच मिशन जुनी पेन्शन , ' ' पेन्शन आमच्या हक्काची , नाही कुणाच्या बापाची ' 'कोण म्हणतं देणार नाही घेतल्या शिवाय रहाणार नाही ' 'कर्मचारी एकजुटीचा विजय असो,या घोषणांनी न्यू आर्टस कॉलेज च्या गेटवर कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन व प्रलंबित मागण्यांसाठी चा संपाचा आज शुक्रवारी चौथा दिवस अधिकच तीव्र दिसुन आला .
अहमदनगर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचा मंगळवार दि .१४ मार्च २०२३ पासून महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू असुन संपाचा आज चौथा दिवस आहे .परंतु अजुनही प्रलंबित मागण्यांवर शासनाकडून कसलाही सकारात्मक प्रतिसाद नाही . यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यां विषयी जोरदार घोषणाबाजी केली .
याप्रसंगी अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या . यावेळी न्यू आर्टस कॉलेजचे जाधव सर यांनी सांगितले की , काही प्रलंबित मागण्यां बरोबरच जुनी पेन्शन मिळावी यासाठी आम्ही सर्वजण हक्काचा लढा देत आहोत. आमची लढाई ही शासना विरोधात अथवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही तर आमच्या प्रलंबित मागण्यांच्या हक्काची लढाई आहे . एखादा कर्मचारी आयुष्यभर काम करतो त्याच्या या योगदानाचा मोबदला त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी तो पेन्शन द्वारे मिळावा ही माफक अपेक्षा आहे . २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळायलाच हवी त्यासाठी आमचा लढा चालूच राहिल असे जाधव सर यांनी सांगितले .
यावेळी प्रा. विलास वाळुंजकर प्रा.राजेंद्र जाधव, प्रा. संजय जाजगे, प्रा.आप्पासाहेब पोमणे, प्रा.मोहन कांजवणे, प्रा.भाऊराव नाडेकर, प्रा. अर्चना काळे, प्रा. आरती साबळे, प्रा. दिपाली रक्ताटे, प्रा.प्रतिभा पवार,प्रा.प्रतिमा शेळके, प्रा.अनिता चव्हाण, महाराष्ट्र बालक मंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शेवाळे, नितीन कराळे, , संतोष कानडे, रविंद्र वर्पे, सिताराम मुळे, पी सी म्हस्के , सौ. ए. एस बारगळ , डी. पी. वराट , श्री. ए. बी. गोरे , एन. पी. पाखरे, श्री. दाते ए. डी ,विजय म्हस्के, सुरेश शिंगणे, दिगंबर भडकवाड, बाबासाहेब वाघुले, रुपेश शिंदे, संजय शिंदे, प्रशांत घोडके, अजय ठोंबरे, श्रीराम बनसोड, चेतन साळवे, भानुदास गुंजाळ, प्रा.राजेंद्र जाधव, प्रा उद्धव उगले ,प्रा दत्तात्रय आहेर, प्रा .चंद्रकांत फसले, धनंजय म्हस्के, प्रा. रविंद्र देवढे, प्रा. दिपक जाधव, प्रा. श्रीम. प्रीतम पवार, प्रा. डॉ. मुक्ता लांडे, प्रा.वर्षा परदेशी यांच्यासह अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपात सहभाग घेतला आहे.

