अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा देणे, त्यांचे सामाजिक प्रश्न व हक्क, कायदेविषयक मार्गदर्शन तसेच आरोग्यविषयक जाणीवजागृतीसाठी दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडीनाका, अहमदनगर येथे एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले. आहे.
तृतीयपंथीयांना संजय गांधी निराधार योजना, शिधापत्रिका, मतदान कार्ड व आधारकार्ड देण्याबरोबरच तृतीयपंथीयांची राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे, प्रमाणपत्र, ओळखपत्र उपलब्ध करुन देण्याबरोबरच तृतीयपंथीयांची जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांर्माफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन आरोग्य विषयक जाणीव जागृती, ताण-तणाव व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी या एकदिवसीय शिबीराचा लाभ घ्यावा. तसेच याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास तृतीयपंथीयांसाठी सुरु करण्यात आलेल्या 0241-2329378 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर -
9561174111