shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार मनोज आगे यांच्या पेरुला श्रीरामपुर**बाजार समीतीत मिळाला उच्चांकी भाव


बेलापूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पेरु या फळास सर्वात उच्चांकीभाव मिळाला असुन पत्रकार आगे यांच्या पेरुला प्रति किलो ६० रुपये इतका भाव मिळाला आहे.
श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आवारात फळ व भाजीपाला लिलावात कांदा, डाळिंब, गवार, मेथी, कोथिंबीर यांना जादा भाव मिळत असून विशेष म्हणजे डाळिंबा बरोबरच आता पेरूनेही उचल खाल्ली असुन ज्येष्ठ पत्रकार शेतकरी मनोज कुमार आगे यांच्या शिवशंकर मळ्यातील पेरूला आज बाजार समितीत याकूबाई बागवान यांच्या लिलाव केंद्रावर विक्रीसाठी आणले होते.


 विशेष म्हणजे या पेरूला आज रविवारी उच्चांकी भाव मिळाला आहे.६० रुपये प्रति किलो दाराने त्यांचा पेरु विकला गेला आहे.  गेल्या आठ दिवसापासून पेरू लिलावासाठी नेण्यात येत होते. सुरुवातीला ३५ रुपये दर मिळाला नंतर ४० रुपये व आ नेज विक्रमी ६० रुपये दर मिळाला त्यामुळे डाळिंबाबरोबरच पेरू नेही आज भाव खाल्ला,यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ पत्रकार तथा प्रगतशील शेतकरी मनोज आगे म्हणाले की शेतकऱ्यांनी सर्वांनी एकाच वेळेस सोयाबीन कांदा, ऊस, गहू करणे चुकीचे असुन आपण एका पिकाला भाव मिळाला तर सर्व शेतकरी तेच पिक घेतात त्यामुळे भाव कोसळतो  त्या ऐवजी शेतीचे योग्य नियोजन करून वेगवेगळी पिके घेतल्यास कमी उत्पन्नात जास्त पैसे मिळतील 

माजी उपनगराध्यक्ष याकूबबाई बागवान यांनी सांगितले की आज पेरूला उंच्चांकी दर मिळाला आहे. चांगला माल असेल तर निश्चितच चांगला दर मिळतो हे श्री.आगे यांच्या पेरू वरून दिसून येते. श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनीही शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रमाणीक प्रयत्न करावेत असे व्यापाऱ्यांना अवाहनही केले आहे.

सहयोगी:
पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close