*जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून कौठळी शाळेतील मुलांना शिक्षकांनी दिले पत्र लेखनाचे धडे..*
जागतिक टपाल दिन कौठळी शाळेत साजरा करण्यात आला.
इंदापूर प्रतिनिधि: दि.९"इंटरनेट च्या आभासी जगातही लॉकर च्या कप्प्यापासून हृदयाच्या कप्प्यापर्यंत ज्याची खास जागा आजही कायम आहे ते म्हणजे टपाल".*
आज इयत्ता ३ री च्या वर्गात शिकवत असताना विद्यार्थ्यांना माझ्या हातात असलेले टपाल(पत्र)दाखवले व त्यांना विचारले हे काय आहे?एक दोन विद्यार्थी सोडले तर बाकी मुले म्हणाली आम्हाला नाही माहीत.मग त्यांना टपाला चे महत्व सांगितले. पत्रलेखन हा घटक घेतला व इंटरनेट च्या काळात पत्रलेखन लुप्त पावत आहे हे देखील पटवून दिले.विद्यार्थ्यांना दुसरा प्रश्न विचारला तुम्ही पोस्टमन काका पाहिलेत का?याचे उत्तर मात्र खूप जणांनी हो असे दिले.कारण पोस्टमन काका शाळेत येतात कधी आधारकार्ड तर कधी मासिके देण्यासाठी.सर्व विद्यार्थ्यांना घरून पत्र लिहून आणायला सांगितले.आज विद्यार्थ्यांनी पत्र प्रत्यक्ष पाहिले व हाताळले त्यामुळे मुले आनंदित झाली.मुलांना पोस्टमन काकांची कामे देखील सांगितली.आज मुलांना एक आगळावेगळा अनुभव मिळाला.खरा टपाल दिन साजरा केल्याचा आनंद शिक्षकांनी मुलांना दिला.