shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बंद अवस्थेत असलेल्या खाजगी बसमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, शिर्डीत खळबळ राजेंद्र बनकर - शिर्डी


एका बंद अवस्थेत व आरटीओ  कारवाईत उभ्या असलेल्या व अनेक वर्षापासून पडून असल्याने  गंजलेल्या अवस्थेत असलेल्या खाजगी बस मध्ये एका तरुणाने गळफास घेवून आपली जीवनयाञा संपवल्याची घटना शिर्डी शहरात घडली आहे.

आरटीओ कारवाईत ताब्यात असलेल्या तसेच शिर्डी पोलिसांच्या हद्दीत असलेल्या या खाजगी प्रवाशी बस मध्ये हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे.अनेक वर्षापासून ही लक्झरी बस आरटीओ विभागाने या ठिकाणी कारवाई दरम्यान लावली होती. श्री साई प्रसादालय रस्त्यावर अतिशय वर्दळीच्या ठिकाणी ही बस उभी केलेली असून गळ्यातील मफलरच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत साधारण ३५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.बसने गंज पकडला असल्याने सदर इसम समोरील काच फोडून आत शिरल्याच दिसून येत आहे.

सदर व्यक्तीची ओळख पटली असुन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर इसमाचे तौफिक मुसा इनामदार असे नाव असुन राहणार कोळपेवाडी, मोतीनगर, ता.कोपरगाव, जि. अहमदनगर, येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सदर इसमाने स्वतः गळफास घेतला की इतर कोणी त्याला गळफास दिला याबाबत पोलिस शोध घेत असुन पोलिसांनी बस चा दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला असुन पुढील कारवाईसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.या घटनेचा अधिकचा तपास शिर्डी पोलिस करत आहे.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close