shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईंजे येथे राष्ट्रपिता महात्मांगांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निम्मित विविध स्पर्धा संपन्न..

भोईंजे:-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईंजे येथे राष्ट्रपिता महात्मांगांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निम्मित  विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या विध्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले इयत्ता पहिली ते 7 वी तील विध्यार्त्यांनी सहभाग नोंदवला या मध्ये  प्रथम क्रमांक 24 विध्यार्थी  द्वितीय क्रमांक 24 तृतीय क्रमांक 24  आणी उत्तेजनार्थ 16 असे 88 विध्यार्थ्यांना बक्षीसे  देण्यात आली.


या वेळी विवेक संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गुरव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यकमा वेळी दत्तात्रय गुरव यांनी शाळेस एक ज्यूस सेट नामदेव मुळे यांच्या हस्ते मुख्याध्यापक  विजयसिंह गटकळ सर  यांच्याकडे देण्यात आली.
 
या वेळी शाळेचे सर्व  शिक्षक सचिन दत्तात्रय देशमुख मुख्याध्यापक. विजयसिंह गटकळ, भाऊसाहेब गुंड, शिवाजी घाडगे, दीपक डोईफोडे उपस्थित होते.
close