shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोकरला श्रीरामपूर - नेवासा राज्य मार्गालगत दोन दुकानचे पत्रे उचकटून चोरी


*भोकर शिवारातील खोकर फाटा येथील घटना, पोलीसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी

*चंद्रकांत झुरंगे - भोकर
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील खोकरफाटा येथे दोन दुकानचे मागील बाजूचे पत्रे उचकटून एका दुकानातून तांब्याची जुनी व नवी तार व दुसर्‍या दुकानातून शेतीची औषधे व रोकड असा मोठा ऐवज घेवून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. तोंडाला कपडा बांधलेले दोघे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याने तालुका पोलीसांपुढे मोठे आव्हान ठाकले आहे. 
या चोरीने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी काल रात्री उशीरापर्यंत पोलीसांत गुन्हा दाखल नव्हता. ग्रामीण भागात पोलीसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.
श्रीरामपूर- नेवासा राज्य मार्गावर भोकर शिवारातील खोकर फाटा परिसर तसा मोठ्या वर्दळीचा रस्ता आहे. येथे अनेक गावांना जोडणारी चौफुली असल्याने येथे बरेच नवीन व्यावसायीकांनी आपले व्यावसाय सुरू केलेले आहे,त्यामुळे एकेकाळी शुकशुकाट असणारा खोकरफाटा आता दिवसभर गजबजलेला असतो. अशा ठिकाणी पवार यांचे शेतालगत असलेल्या दोन पत्र्याच्या गाळ्यातील पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत मोठी चोरी केली.
खोकर फाटा येथे तुकाराम कांबळे यांनी ‘मौनगीरी अ‍ॅग्रो’ नावाने कृषी सेवा केंद्र सुरू केलेले आहे. या कृषी सेवा केंद्राच्या मागील बाजूचा पत्रा अज्ञात चोरट्यांनी काल सोमवार दि.२ आक्टोबर रोजी पहाटे पावने तीन वाजेच्या सुमारास उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत त्याच्या दुकानातून रोख रकमेसह काही शेतीची औषधे घेवून चोरट्यांनी पोबारा केला. या चारेट्यांनी कांबळे यांच्या दुकानातून रोख रक्कम व काही महागडी औषधे चोरली परंतू कांबळे हे बाहेरगावी असल्याने काय व कीती रकमेची चोरी झाली हे समजू शकले नाही. या दुकानात सीसीटिव्ही कॅमेर्‍यात दोघे चोरटे असल्याचे दिसत असून त्यांनी तोंड बांधलेले असल्याने हे पोलीसांसमोर मोठे आव्हान आहे.
याच दुकानाच्या शेजारी माळवाडगांव येथील अशोक थोरात यांनी दिड महिन्यांपुर्वी येथे इलेक्ट्रीक मोटार रिवाडींगचा व्यावसाय सुरू केला. व्यावसायात प्रगती असल्याने त्यांनी आपल्या दुकानात इलेक्ट्रीक मोटार रिवायडींगसाठी सुमारे वीस कीलो नवीन तांब्याची तार आणुन ठेवलेली होती, त्याच बरोबर या दुकानात जूनी तांब्याची तार देखील शिल्लक होती. या चोरट्यानी या दुकानच्या पुर्वेकडील बाजूच्या पत्र्यांचे नट खोलून दुकानात प्रवेश करून सुमारे २२ हाजराची तांब्याची तार चोरट्यांनी चोरून नेली. दुकानापासून श्रीरामपूरच्या दिशेने सुमारे पाचशे मिटर लांब या तारेचे रिकामे बॉक्स फेकुन देत पोबारा केला. 

दरम्यान तुकाराम कांबळे हे येथून जवळच राज्यमार्गालगत असलेल्या खेडकरवस्ती येथे राहतात. या वस्तीवर सहा महिन्यांपुर्वी म्हणजेच दि.१३ एप्रीलच्या भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी घरात कुणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश करत कपाटाच्या लॉकरचा दरवाजा तोडून कपाटातील सामानाची उचकापाचक करून त्यातील पन्नास हजाराची रोकड व एक तोळ्याचे मनी मंगळसुत्र असा सुमारे एक लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या चोरीचा अद्याप तपास लागलेला नसल्याने सहा महिन्यात राज्यमार्गालगत झालेली कांबळे यांची ही दुसरी चोरीची घटना झालेली आहे. 
घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. राजु त्रिभुवन, पोलीस पाटील बाबासाहेब साळवे व पोलीस मित्र बाबा सय्यद हे चोरट्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलीसांत गुन्हा दाखल नव्हता.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close