खोकर सोसायटीची वार्षीक सभा खेळीमेळीत संपन्न
चंद्रकांत झुरंगे - भोकर
खोकर विविध कार्यकारी सोसायटीने जिल्हा बँकेमार्फत सभासद शेतकर्यांना घरबांधणीसाठी, संकरीत गायी खरेदीसाठी व ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देवून शेतकर्यांना स्वावलंबी करण्यासाठी विशेष प्रयत्नशिल आहे. अशोक सह.साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकूटे यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. लवकरच हि संस्था तालुक्यात प्रथम क्रमांकावर असेल असा विश्वास अशोकचे संचालक ज्ञानेश्वर काळे यांनी व्यक्त केला. संस्थेची वार्षीक सभा शांततेत व खेळीमेळीत संपन्न झाली.
श्रीरामपूर तालुक्यात प्रगतीपथावर असलेल्या खोकर विविध कार्यकारी सोसायटीच्या वार्षीक़ सर्वसाधारण सभेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. सोसायटीचे आद्य प्रवर्तक स्व.शंकरराव बळवंत पा.पटारे सभागृहात संपन्न झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव कोल्हे हे होते तर अशोकचे संचालक ज्ञानेश्वर काळे, अशोक बँकेचे संचालक बाबासाहेब काळे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक राजु चक्रनारायण व अशोकचे माजी उपाध्यक्ष पोपटराव जाधव आदि प्रमुख मान्यवर या वेळी उपस्थीत होते.
सोसायटी लवकरच वेगवेगळे उद्योग व्यावसाय सुरू करून संस्थेचा नफा वाढीसाठी हे संचालक विशेष प्रयत्न करणार आहे. सध्या दुष्काळी परीस्थीती असल्याने शेतकरी अडचणीत आहे, पर्यायाने याचा परीणाम संस्थेच्या वसुलावर दुष्परीणाम होत आहे.
संस्थापातळीवर वसुलाचे सध्या मोठे आव्हान आहे, थकबाकीचे प्रमाण वाढल्याने संस्थेचा नफा घटल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सभासदांना केवळ टक्के लाभांश द्यावा लागत असला तरी भविष्यात आपल्या संस्थेची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असे ही यावेळी ज्ञानेश्वर काळे यांनी सांगीतले.
खोकर सोसायटीला जिल्हा बँकेकडून मोठी रक्कम येणे आहे परंतू जिल्हा बँक ती रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याने संस्थेने जिल्हा बँकेच्या विरोधात न्यायालयात जाण्याची गरज असल्याचे मत अशोकचे माजी उपाध्यक्ष व सोसायटीचे जेष्ठ संचालक पोपटराव जाधव यांनी व्यक्त केले. तर सोसायटी संचालक मंडळाने गेल्या वर्षी दिलेल्या शब्दांची वचन पुर्ती केलेबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक राजु चक्रनारायण यांनी मांडला. तसेच सध्या दुष्काळी परीस्थीती असल्याने सोसायटी व ग्रामपंचायतीने ठराव घेवून आपली आनेवारी कमी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी राजू चक्रनारायण यांनी केली.
सभेचे व्यावस्थापन व्यावस्थापक कृष्णा शिंदे यांनी केले. एकंदरीत हि सभा खेळीमेळीत व शांततेत संपन्न झाली.
या सभेस सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब सिन्नरकर, संजय काळे, कादर सय्यद, प्रकाश पवार, बाळासाहेब कचरे, केशवराव चव्हाण, बाळासाहेब पटारे, शंकरराव शेरकर,सुशिला गव्हाणे, मथुरा चक्रनारायण, प्रयागाबाई भणगे, अशोक काळे, बाळासाहेब काळे, गणेश काळे, ज्ञानदेव पवार, उततम पुंड, लक्ष्मण शेरकर, सुकदेव सिन्नरकर, जालींधर पटारे, नामदेव सलालकर, बाळासाहेब सलालकर, काशिनाथ गव्हाणे, सुरेश सिन्नरकर, बाळासाहेब शेरकर, बाळासाहेब जाधव, ताजखाँ पठाण अदिंसह सोसायटीचे सचीव कृष्णा शिंदे, भाऊसाहेब चव्हाण, मन्सुर पठाण, भाऊसाहेब भणगे आदिंसह मोठ्या संख्येने सीासद उपस्थित होते.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

