shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयास आदर्श महाविद्यालय पुरस्कार...!


सातारा: रयत शिक्षण संस्थेचे व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयास आदर्श स्वायत्त महाविद्यालय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रयत शिक्षण संस्थेतील विविध स्वायत्त महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या विविध उपयोजना, पायाभूत सेवा सुविधा, प्लेसमेंट, इत्यादी विकासांच्या आधारे रयत शिक्षण संस्थेतेद्वारे मा.डॉ पतंगराव कदम यांचे नावे दिला जाणारा आदर्श स्वायत्त महाविद्यालय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दिनांक ०४ ऑक्टोबर रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सदर पुरस्कार वितरीत केला जाणार आहे. 

     धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय हे रयत शिक्षण संस्थेतील पहिले स्वायत्त महाविद्यालय असून सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयास स्वायत्तत्ता प्राप्त झालेली आहे. सन २०२१ पासून हे महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या विद्यापीठाचे घटक महाविद्यालय म्हणून कार्यरत आहे. महाविद्यालयात बी.कॉम.(अकाऊंटन्शी), बी.कॉम. (व्यवसाय व्यवस्थापन), बी.कॉम. (फायनान्शिअल मार्केट्स), बी.कॉम. (बँक मॅनेजमेंट), बी.कॉम. (इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी) बी.सी.ए.,  एम.कॉम.(ॲडव्हान्सड अकाऊंटन्शी), एम.कॉम.(व्यवसाय व्यवस्थापन), एम.कॉम.(बँक मॅनेजमेंट), एम.कॉम.(इन्फॉमेशन टेक्नॉलॉजी) हे अभ्यासक्रम आहेत. विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस, आय बी पी एस बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,स्टॉक मार्केट लॅबॉरेटरी .मॉक बँक ,उद्योजकता विकास केंद्र, करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेल ,सी.ए. व सी.एस. मार्गदर्शन केंद्र इत्यादीच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय प्रयत्नशील असून महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी चार्टर्ड अकाऊंटट, कंपनी सेक्रेटरी बँक ऑफिसर,प्राध्यापक, स्टॉक मार्केट अनालिस्ट, उदोजक ,आय.टी. ऑफिसर इत्यादी पदावर कार्यरत आहेत. महाविद्यालयातील उत्तम पायाभूत सेवा सुविधा ,उत्तम व अनुभवी शिक्षक ,उत्तम मार्गदर्शकामुळे महाविद्यालयास नुकत्याच झालेल्या नॅक तपासणीत A++ ग्रेड प्राप्त झालेली आहे. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.श्री चंद्रकांत दळवी ,संघटक डॉ.अनिल पाटील ,सचिव मा. श्री विकास देशमुख, सहसचिव उच्च शिक्षण मा.प्रिं. डॉ.ज्ञानदेव म्हस्के, ऑडीटर मा.प्रिं. डॉ.शिवलिंग मेनकुदळे आदी मान्यवरांनी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, स्वायत्त महाविद्यालय समितीचे समन्वयक डॉ विजय कुंभार, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांचे हार्दिक अभिनंदन केले .
close