shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देशभरात साई मंदिरे उभारण्याचा निर्णय साई संस्थान ने मागे घ्यावा यासाठी 5 ऑक्टोबर 2023 पासून आमरण उपोषण करणार - मा उपनगराध्यक्ष विजयराव जगताप


शिर्डीचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक रुपया हि बाहेरगावी जाऊ देणार नाही - मा नगराध्यक्ष अनिताताई जगताप

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

शिर्डी साईबाबा संस्थान ने देशभर साई मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे साई संस्थान ला एखाद्या राज्याने किंवा संस्थेने पाच एकर जागा दिल्यास संस्थान तेथे शिर्डीसारखे मंदिर उभारणार तेथे अन्नदान रुग्णसेवा आदी उपक्रमही राबवणार किंवा मंदिर बांधकामासाठी 50 लाखापर्यंत मदत करणार यासह साई मंदिराची असोसिएशन काढण्यासारखे अन्य काही निर्णय विचाराधीन असल्याचे साई संस्थान चे सीईओ पी शिवा शंकर यांनी नुकतेच जाहीर केले आहे वास्तविक साई संस्थान ला आपला इथला कारभार सांभाळण्यास तारेवरची कसरत करावी लागते रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे महाविद्यालय ही अद्याप सुरळीत झालेली नाहीत अनेक भाषेतील ग्रंथ ही अनेकदा आपल्याला भाविकांना पुरवठा येत नाही लेझर शो साई गार्डनच्या घोषणा एकूण एक पिढी संपली पण त्यावर संस्थान ने काहीही केले नाही ५९८ कर्मचाऱ्यांचे प्रश्न संस्थान ला अनेक वर्षात सोडवता आले नाही.

संस्थान ला येथील कामगारावरच नियंत्रण ठेवणे अवघड जात असताना संस्थान बाहेर आणखी पसारा वाढविण्याच्या विचारात असल्याचे एकूण आश्चर्य वाटले शिर्डीत विकास कामांना निधी मागितला तरी संस्थान अनेकदा आमचा बाहेर काही संबंध नसल्याचे सांगते मग आता मग आता बाहेर मंदिरे कसे उभारणार असा प्रश्न आहे देशातील कोणत्याही देवस्थानने आपली इतरत्र शाखा काढल्याचे ऐकण्यात आली नाही संस्थान मात्र हा अभिनय उपक्रम राबवित आहे संस्थान आपल्या वेबसाईटवरून संगणक शटर यासाठी इतकेच काय उत्साहातील मंदिर सजावटीसाठी देणगी मागते उच्च न्यायालय नियुक्त समिती सारखे जबाबदार व्यक्तींची समिती बेजबाबदारपणे तूगलकी निर्णय घेते याचे आश्चर्य वाटते.

साई संस्थान ने तातडीने हे निर्णय मागे घ्यावेत अन्यथा आम्ही मा नगराध्यक्षा अनिताताई जगताप व मा उपनगराध्यक्ष विजयराव जगताप 5 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजले पासून श्री साईबाबा मंदिर परिसर येथे उपोषणास बसणार आहोत यानंतर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी साई संस्थान ची असेल असे विजयराव जगताप यांनी सांगितले.
close