shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहाता येथे अखिल भारतीय सरपंच महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न...


गावांचा, खेड्यांचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत व सरपंचाची महत्वाची भूमिका ना. राधाकृष्णविखे पाटील

शिर्डी प्रतिनिधी : 
सध्या खेड्यातून शहराकडे नागरिकांचा जाण्याचा कल अधिक असल्यामुळे शहरांमध्ये झोपडपट्ट्यांची संख्या वाढली आहे . परंतु जर गावात, आपल्या खेड्यातच राज्य, केंद्र सरकारच्या विविध योजना राबवून व रोजगार निर्मिती करून गावाचा खेड्याचा विकास केला तर नक्कीच हे स्थलांतर थांबेल. मात्र त्यासाठी सरपंचाची भूमिका महत्त्वाची आहे. व त्यासाठी त्या त्या गावातील ग्रामस्थांचा सहभागही आवश्यक आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. अखिल भारतीय सरपंच महासंघ च्या महाराष्ट्र नुतन कार्यकारिणी नियुक्तीचा सन्मान सोहळा नुकताच राहता येथील साई विठ्ठला लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. या कार्यक्रमात अखिल भारतीय सरपंच महासंघाच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी दत्तात्रय पांडुरंग शेटे व उपाध्यक्षपदी बाळासाहेब जनार्दन जपे यांना अखिल भारतीय सरपंच महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केवलराम बारसे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच यावेळी इतर कार्यकारणीचीही निवड करण्यात आली. या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तसेच तारकेश्वर गडाचे मंहत गुरुवर्य परमपूज्य आदिनाथजी महाराज शास्त्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


या कार्यक्रमाला राधा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जेजुरकर, गणेश कारखान्याची माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, विद्यमान चेअरमन ज्ञानेश्वर गोंदकर, पाथर्डी चे विनायकराव आव्हाड, गंगाधर पाटील चौधरी, श्रीरामपूरचे अण्णा पाटील थोरात, संगमनेरचे नवनाथ अरगडे, कोतुळचे किरण देशमुख, श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर देशमुख, संभाजीनगर जिल्ह्यातील अँड. किरण मगर, नाशिक जिल्ह्याचे सरपंच महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब जाधव, देहू आळंदीचे सरपंच, आदीसह राज्यातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पंचायत राज्य व्यवस्थेमध्ये घटना दुरुस्ती झाल्यानंतर ग्रामपंचायतीला मोठे अधिकार आले. त्यामुळे गावचा विकास होण्यासाठी मोठी मदत होत आहे. त्यासाठी सरपंचाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र सरपंच होताना काय कसरत करावी लागते. हे सर्वांनाच माहिती आहे ते सांगण्याची गरज नाही. पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, या घोषणाप्रमाणे सर्व गावातील, खेड्यातील सरपंच व ग्रामस्थांनी सकारात्मक भूमिका पार पाडली तर नक्कीच ग्रामीण भागात विकासाला चालना मिळू शकते. खेड्यातच राज्य, केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवल्या, वैयक्तिक तसेच घरकुल सारख्या योजना राबवल्या तर नक्कीच खेड्यातून शहरात जाण्याचे प्रमाण कमी होईल व स्थलांतर थांबेल. त्यासाठी गावामध्ये कोणता समाज ,कोणाचा पुढारी आहे, त्याला महत्त्व न देता विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करताना सरपंच ग्रामसेवक यांच्यासह त्यासाठी सहयोग दिला पाहिजे तसेच विविध योजना मिळवण्यासाठी आता कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. सर्व काही ऑनलाईन झालेले आहे संगणकावर सर्व योजना पाहायला मिळतात पण त्यासाठी नागरिकांचे प्रयत्न महत्त्वाचे आहे. असे सांगत दोन ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती आहे. त्यानिमित्ताने स्वच्छता मोहीम ही प्रत्येक गावात प्रत्येकाने स्वयं स्फूर्तीने राबवली पाहिजे. असे यावेळी त्यांनी सर्वांना आवाहन करून अखिल भारतीय सरपंच महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी दत्तात्रय शेटे व उपाध्यक्षपदी बाळासाहेब जपे पा. यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व या सरपंच महासंघाच्या वतीने राज्यातील सरपंचांना आणखी पाठबळ मिळेल व त्यातून गावाचा विकास साधेल असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात अखिल भारतीय सरपंच महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष केवलराम बारसे यांनी हिंदी मधून बोलताना सांगितले की, अखिल भारतीय सरपंच महासंघ च्या महाराष्ट्र नूतन कार्यकारणीची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून महाराष्ट्रात सरपंच महासंघ अधिक मजबूत होऊन सरपंचाचे संघटन करून त्यांना राजकीय पातळीवर व काही विघ्न संतोषी लोकांकडून जो गावा गावात सरपंचांना त्रास होत असतो त्यासाठी हा सरपंच महासंघ नेहमी सरपंचाच्या पाठीशी उभा राहील. तसेच सरपंचाचे वेगवेगळे अधिकार, जबाबदाऱ्या, राज्य, केंद्र सरकारच्या योजना तसेच या सरपंच महासंघाच्या वतीने सरपंचाच्या माध्यमातून गावाला कसे मिळतील. याचा प्रयत्न महासंघ करेल. गाव हेच नेते, मंत्री बनवत असतात. म्हणून गावाला, ग्रामपंचायतीला, सरपंचाला मोठे महत्त्व आहे. असे सांगत महाराष्ट्रात सरपंच महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी दत्तात्रय शेटे उपाध्यक्षपदी बाळासाहेब जपे व महाराष्ट्राचे सरपंच महासंघाचे प्रभारी विनोदजी वहाडणे पाटील या तीन मूर्ती या नक्कीच सरपंच महासंघाला महाराष्ट्र राज्यात मजबूत, विशाल बनवतील अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त करत महाराष्ट्र सरपंच महासंघाच्या या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तर यावेळी या सरपंच महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना आशीर्वाद देताना तारकेश्वर गडाचे गुरुवर्य मंहत परमपूज्य आदिनाथजी महाराज शास्त्री यांनी सांगितले की, गावाचा विकास हा ग्रामपंचायत, सरपंचाच्या माध्यमातून गावाला समृद्धीकडे नेत असतो. त्यामुळे सरपंच व सरपंच महासंघाच्या माध्यमातून समाजसेवा करताना कुटुंबा प्रमाणेच आपल्या गावाची सेवा सरपंचांनी करावी. त्यांना ग्रामस्थांनीही साथ द्यावी, समाजसेवा हीच भक्ती आहे व चालते बोलते समाजसेवक हेच देव आहेत. असे समजून आपण सरपंच म्हणून सर्व समाजावर कुटुंबा प्रमाणेच प्रेम करावे व गावाचा विकास कसा साधता येईल. यासाठी प्रयत्न करावा. असे सांगत यापुढेही सरपंच महासंघाच्या व सरपंचाच्या हातून चांगले गावाचे काम घडवून व देशाचा विकास होऊन भारत जगात शक्तिशाली लवकरात लवकर बनेल असा आशीर्वाद त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अखिल भारतीय सरपंच महासंघाचे नूतन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय शेटे व उपाध्यक्ष बाळासाहेब जपे पा. यांनी सरपंच महासंघ च्या वतीने सर्व प्रमुख मान्यवर व राज्यातून आलेले सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांचे स्वागत केले. महाराष्ट्र सरपंच महासंघाचे नुतन प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे पा. यांनी यावेळी प्रास्ताविकात सांगितले की, आमची ही जी नियुक्ती केली . या सरपंच महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये नक्कीच सरपंच यांना अधिकाधिक संघटनेच्या माध्यमातून शक्ती मिळावी, पाठबळ मिळावे, विविध योजना गावात राबवण्यासाठी त्यांना एक प्रेरणा, सहकार्य मिळावे म्हणून सरपंच महासंघ नक्कीच प्रयत्नशील राहील व त्यामुळे राज्याचा देशाचा विकास साधण्यासाठी या सरपंच महासंघाच्या माध्यमातून नक्कीच प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय शेटे व आपण आणि संपूर्ण कार्यकारणी त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. या कार्यक्रमात विविध राज्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी यांनी सरपंच महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय शेटे व उपाध्यक्ष बाळासाहेब जपे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विविध संस्थांच्या ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित यांचे सावळीविहीर बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच ओमेश साहेबराव जपे पा. यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राज्यातील पुणे नाशिक, अहमदनगर, संभाजीनगर, बीड आदींसह विविध जिल्ह्यातील, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, विविध संस्थांनचे आजी- माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात लक्ष्मीवाडी येथील सोमैय्या विद्यामंदिर चे मुख्याध्यापक धायतडक सर यांना आदर्श मुख्याध्यापक हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व्यासपीठावर सत्कार करण्यात आला.
close