आजार होऊन बरा करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी मार्गदर्शन करणे फार महत्वाचे - डॉ.रविंद्र कुटे.
इंदापूर इंडियन मेडिकल असोशिएशन कडून "आवो गाव चलो " हे अभियान अंतर्गत पांधारवाडी गाव घेतले दत्तक.
इंदापूर प्रतिनिधि: आजार होऊन बरा करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी मार्गदर्शन करणे फार महत्वाचे आहे असे उद्गार इंडियन मेडिकल असोसिएशन चे राज्य अध्यक्ष डॉ.रविंद्र कुटे यांनी पांधारवाडी येथे "आवो गाव चलो " हे अभियान अंतर्गत भेटी दरम्यान उपस्थित कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील पांधारवाडी गाव दत्तक घेऊन इंदापूर इंडियन मेडिकल असोशिएशन कडून "आवो गाव चलो " हे अभियान राबवले जात आहे. यानिमित्त असोशिएशनचे राज्याचे अध्यक्ष रविंद्र कुटे यांनी शनिवारी (दि.३० सप्टें) रोजी इंदापूरातील वडापुरी नजिक पंधारवाडीला भेट दिली.
यावेळी गावकऱ्यांनी हलगीच्या निनादात इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यवरांचे स्वागत करीत त्यांचे ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढली. याप्रसंगी लाठीकाठी या सहासी खेळ गावातील मुलींनी सादर केला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ.रविंद्र कुटे यांनी पंधारवाडी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना म्हंटले की खेड्यातील लोकांचे आरोग्य उंचावण्यासाठी इंडियन मेडिकल असोशिएशन यावर्षी "आवो गाव चलो " हा उपक्रम राबवत आहे .
इंडियन मेडिकल असोशिएशन ही अँलोपॅथी डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावर साडेचार लाख सदस्य असून एक हजार सातशे शाखा आहेत. तर राज्यात पन्नास हजार सदस्य असून दोनशे पंचेचाळीस शाखा आहेत. यातून आम्ही सामाजिक दायीत्वाचा प्रचार आणि प्रसार करीत आहोत. असेच काम गेली सहा महिन्यापासून या गावात चालू आहे त्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांना भेटी देऊन लोकांशी संवाद साधला जात आहे. सर्वांगिण आरोग्याच्या दृष्टीने आराखडा आखला आहे. अँनिमिया मुक्त अभियान, मुलींसाठी मासीक पाळीत घ्यावयाची काळजी, महिलांसाठी ब्रेस्ट कँन्सर, सर्वाइकल कँन्सर याचा अटकाव कसा करता येईल यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.केवळ कार्यक्रम घेतले जात नाहीत तर इंदापूर इंडियन मेडिकल असोशिएशन शाखेने ५० रुग्णांची मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मोफत करुन देऊन त्यांना दृष्टी उपलब्ध करुन दिली आहे. व्यसनमुक्तीसाठी ही प्रयत्नशील आहे.रक्तदान, मधुमेह, दमा, संधीवात, कर्करोग अशा आजाराविषयी जनजागृती करणं, रुग्णांची तपासणी करुन प्राथमिक अवस्थेत त्यांना इलाज करणे हे महत्वपूर्ण काम चालू आहे. आजार होऊन बरा करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी मार्गदर्शन करणे फार महत्वाचे आहे. गावाकडील लोकांना समजावून सांगणे आणि त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी गेले सहा ते सात महिने आय एम ए इंदापूर कार्यरत आहे.या पुढेही कार्यरत राहिल आणि त्यांच्या आरोग्याशी बांधिलकी ठेवेल असे म्हणत त्यांनी इंदापुरच्या शाखेचे कौतुक केले.
यावेळी गाव चलो अभियानाचे चेअरमन डॉ. बिपिनभाई पटेल, व्हा.चेअरमन डॉ. अनिल पाचनेकर राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. राम आरणकर उपसरपंच भगत यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान इंदापूरच्या अध्यक्षा डॉ. कल्पना खाडे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या कामकाजाविषयी आणि ध्येय धोरणांविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी आय एम ए चे राज्याचे उपाध्यक्ष डॉ. अमर पवार, राज्य अकॅडमीक मेडिकल स्पेशालिटी हेडचे चेअरमन डॉ. संतोष खडतरे, अकलूज चे अध्यक्ष डॉ. संजय सिद, पंढरपूरचे अध्यक्ष डॉ. सुनील कारंडे, बारामतीचे सचिव डॉ. राजेश कोकरे, इंदापूरच्या सेक्रेटरी डॉ .प्रतिभा वनवे, डॉ. संजय देशमुख, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. सागर दोशी, डॉ. महेश रुपनवर, डॉ. सुधीर तांबिले डॉ. अनिल शिर्के, डॉ. दत्ता गार्डे, डॉ. संजय शहा, डॉ. उदय अजोतीकर, डॉ. दिपाली खबाले ,डॉ. कोमल गार्डे,
गावचे सरपंच दिगंबर निंबाळकर, उपसरपंच किसन भगत, ग्रामसेवक फिरोज पठाण, पोलीस पाटील महेश नलवडे ,माजी सोसायटीचे चेअरमन नारायण नलवडे, सदस्य व्यंकट भोसले सदस्य अमोली बर्गे, तसेच इतर अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमांमध्ये महिलांना आरोग्य किटचे वाटप केले तर लाटी-काटी खेळातील मुलींना रोख रकमेचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिजीत ठोंबरे यांनी केले तर आभार डॉ. अतुल वनवे यांनी मांनले.