श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे माऊली वृद्धाश्रमातील वृद्ध स्त्री पुरुष, निराधार मुले यांना दिवाळीचा फराळ देण्यात आला.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव सुकळे, वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये,सुयोग बुरकुले यांनी वृद्धाश्रमातील दत्तात्रय खिलारी यांच्याकडे फराळ सुपूर्द केला.
यावेळी वृद्धाश्रमातील अनेकजण उपस्थित होते.दत्तात्रय खिलारी यांनी सर्वांचे आभार मानले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

