श्रीरामपूर प्रतिनिधी:
जिद्द सोशल फाउंडेशनच्या विद्यमाने उद्या शनिवार (दि.१६ मार्च) रोजी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (यु.के.) सन्मानित छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर तसेच कोपरगांव नगरपरिषदेच्या कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्वेता शिंदे- तळेकर या प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देताना सौ.मुरकुटे म्हणाल्या की, महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे उद्या शनिवारी दुपारी ३ वा. उत्सव मंगल कार्यालय येथे आयोजन केले आहे. याप्रसंगी रमादेवी धिवर (सामाजिक), डॉ.रश्मी तुपे (वैद्यकीय), संगीता जगधने (कृषी), साईलता सामलेटी (प्रशासन), हर्षदा भावसार (कला), सिस्टर जेंसीया मेरी (रुग्णसेवा), अनिता सहानी (व्यवसाय), पूर्वा दाभाडे (सार्वजनिक स्वच्छता), अॕड. शुभदा औताडे (विधी क्षेत्र), पुनम बारसे (शैक्षणिक), विद्या काळे (आर्थिक), ह.भ.प.योगिताताई उंडे (अध्यात्मिक व धार्मिक) या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या माऊली वृद्धाश्रमच्या कल्पना वाघुंडे आणि आशांकुरच्या प्रिस्का तुर्की यांचाही विशेष सन्मान होणार आहे. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम व लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले असून आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असल्याचे संयोजकांनी सांगितले.
तरी सदर कार्यक्रमास महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिद्द फौंडेशनच्या अध्यक्ष सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, माजी नगराध्यक्ष सौ.इंदुमती डावखर, पं. समितीच्या माजी सभापती डॉ.सौ.सुनिताताई गायकवाड, सौ.शितलताई गवारे, सौ.दिपाली संचेती, सौ.लताताई धनवटे, सौ.शालिनी कोलते, सौ.संगीता लटमाळे, सौ.ताराबाई आगरकर, सौ.सुरेखा डहाळे, सौ.संगीता शिंदे, सौ.आश्विनी दिवे, सौ.मीना चौधरी, सौ.स्मिता पाटील यांनी केले आहे.
*पत्रकार अफजल मेमन,श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111