shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रमजान रोजा -"अलौकीक - अदभुत - अदुतीय शब्द न शब्द व क्षण- न - क्षणाचं पुण्यं भेटेल


-----------------------------
रमजान मुबारक - २०२४
शुक्रवार - रोजा नं. ०४
दि. १५ मार्च २०२४
------------------------------

अलौकिक  पर्वाची सुरुवात  अल्लाहा (परमेश्वर )च्या असिम  कृपेने  उत्साहमय रितीने होऊन  , अल्लाहाशी "सर्व संतू सुखामय  " अर्थात सर्व जगात सुखरूप -निरोगी -शांती राहो अर्थात (आफीयत से  रखैं) व  त्याबरोबरच जगातील सर्व लोकांच्या -प्राणीमात्रांच्या त्रास मुक्तीची , जगात सर्वत्र शांतता नांदावी यासाठी दुआ याचना करत खास  रमजान मुबारक महीन्यातील विशेष अलौकीक   " तराविह" नमाज संबोधतात ,तर  आशा तराविह ची नमाज अदा  करतात. दैनंदिन पाच वेळेची अनिवार्य ( कम्पल्सरी) फर्ज नमाज व्यतिरिक्त ही फक्त रमजानुल मुबारक च्या तीस दिवसांच्या पुरतीच मर्यादित असते .

 दैनंदिन रोजच्या नमाज पठण- (१) फजर - (भोर- पहाटेच्या ५-३०-ते ६-० वाजेपर्यंत, सुर्योदय आगोदर)
 (२) जोहर - दुपारी १२-३० ते ३-० वाजेपर्यंत,
(३) असर - (संध्या -गोरज मुहूर्त - ४-६ वाजे, किंवा लाल आकाशा पर्यंत)
(४)मगरीब - (संध्या-सुर्यास्तांनंतर )
(५) ईशा - रात्री ८-३० ते उशिरापर्यंत,
या दिवसभरातील अनिवार्य  - फर्ज नमाज व्यतिरिक्त रात्रीच्या" ईशा" नमाज बरोबरच "तराविह"  २० रकाअत आपापल्या दिवसभरातील जिवनोपयोगी गरजेचे पुर्णतः पुरतता करून, मोलमजुरी ,कामधंदा आटोपून, मुलांसह  हजर होतात.
तराविह  विशेषत दिड ते दोन तासांची १-३० ते २-०० तासाभरात दिव्य कुरआन चे  दिड पारा (अध्याय) चे  पढण केले जाते. परंतु काही मस्जिदीमधे दोन तर काही ठिकाणी तीन पाऱ्यांची ही सोय केलेली असते. तरूण वर्ग या दोन -तीन च्या पाऱ्यांच्या पढणात जास्त  प्रमाणात सबाब ( पुण्यं) प्राप्ती साठी समाविष्ट असतात. 
यामध्ये अल्लाहा (परमेश्वर) ने धरतीवर जन्नत (स्वर्गा) तुन विशेष दुत हजरत जिब्राईल अलै. यांच्या मार्फत जगाला एकमेवदुतीय दिव्य कुरआन  रमजान महिन्यातच प्रेषित मुहम्मद स्व.सल्लमांच्या हाती - कडे समस्त मानव जातीने  दैनंदिन जीवनात जीवन कसे जगावे - व्यतित करायला पाहिजे ( वे ऑफ लिव्हिंग लाईफ ) याचे मार्गदर्शन करण्यासाठी एक  मार्गदर्शक ग्रंथ पवित्र दिव्य कुरआन पाठविले.
    हे पवित्र कुरआन २३ तेवीस वर्षापर्यंत जसे -जसे काळानुरूप - काळानुसार, विविध विशिष्ट प्रकारच्या गरजेनुसार -गरजेप्रमाणे थोडं थोडं करून पाठवले, यामध्ये ६ ६ ६ ६ (सहा हाजार सहाशे सहासष्ट ) आयाती (verses, ओव्या ), ११४ (ऐकशे चौदा) सुराहा , व ३० (तीस) पारा (अध्याय) ना समाविष्ट करण्यात आले आहेत.
       याचे १४५० वर्षेपासून असंख्य तज्ञांच्या  संशोधनानुसार अपले मते विश्लेषण केले असता असे दिसून आले किंवा लक्षात आले की, दिव्य कुरआन हे कायम वर्तमान-काळात असल्याचे दिसून येवून पुढे भविष्य काळातील घडणाऱ्या घटनांचे निरुपम करण्यासाठी मार्गदर्शन सुध्दा करते, अर्थात ते काळानुरूप आधारित आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सुध्दा मार्गदर्शन करतांना दिसते.तसेच साहित्यिकांनी संशोधन केले असता त्यांच्या मते हे अलंकार युक्त व कवींनी आपल्या मते कोणत्याही अलंकारात फिट्ट बसते ..
आणि विशेषतः  हाजारोंवेळी वाचले तरी रोज काही तरी नवीनच वाचल्याचं - शिकल्याचं मनात नक्कीच वाटते . 
              असं अलौकिक -अतिशयोक्ती- अतुलनीय -अद्वुतीय अद्भुत पवित्र दिव्य कुरआन  प्रेषित हजरत मुहम्मद स्व. यांनी आपल्या मित्रांना  अरबी भाषेत सहाबा( रजि.) च्या मार्फत सर्व जगात पाठवले.आशा पवित्र कुरआनचे प्रत्येक शब्द न शब्द नमाजमधे हाफीज -ए-कुरआन किंवा कारी- ए- कुरआन म्हणजे ज्या व्यक्तींना व्याकरणासह अलंकारिक पध्दतीने सात विविध प्रकारच्या पध्दतीने संपूर्ण  कुरआन तोंडपाठ  असे व्यक्ति, उत्साहमय वातावरणात तराविह नमाज पढण करून बांधवांना मंत्रमुक्त करतात.
 आशा अलौकीक पर्वाची बांधव वर्ष भर आतुरतेने वाट पाहत असतात.
 प्रेषित मुहम्मद स्व.ने म्हटले की," रमजान मधील नमाजचे पुण्यं -सबाब हे सत्तर (७०) पटीने जास्त प्रमाणात प्राप्त होईल कुरआनच्या प्रत्येक शब्द न शब्द व - क्षण न क्षणाच पुण्यं - सबाब तुम्हाला नक्कीच भेटेल.' ". हे भाग्य फक्त रमजानुल मुबारक महीनाभरापुरतंचं मर्यादित असतं..
आणि म्हणूनच या सबाब  प्राप्तीसाठी करोडों बांधंव जगातील कुठल्याही मस्जिदी या तुडुंब भरलेल्या असतात...
      मग अशा  क्षणा क्षणाला मिळणाऱ्या पुण्यं सबाब कमावण्याची संधी कोणं सोडेल...?

(मित्रांनो आपल्या मित्रांना , नातेवाईकांनां आवश्य पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा )

*लेखन : डॉ. सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर -
९२७१६४००१४
 *संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close