श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील हरिगांव येथील शेती महामंडळाची हरिगांव गावठाण विस्तारासाठी गावठाण जवळील ३.५० हेक्टर गावठाण विस्तारीकरण,३.५० हेक्टर शासकीय घरकुल योजना, आणि एक एक हेक्टर जमीन घनकचरा व्यवस्थापन साठी असे ८ हेक्टर जमीन,व उपविभाग ३ एकूण क्षेत्र ४७३.८४ हे.आर मधील क्षेत्र हरिगांव ग्रामपंचायतला घरकुलासाठी राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा.यांच्या प्रयत्नातून मागणी केलेप्रमाणे मंजूर झाले असून गोर गरिबांना न्याय मिळाला असल्याचे प्रतिपादन हरिगांवचे प्रभारी सरपंच दिलीप त्रिभुवन यांनी सांगितले..
याआधीच्या महसूल मंत्री यांनी प्रस्ताव सादर असताना कोणतीही दखल घेतली नाही. ना.विखे पाटील यांनी संबंधित खात्यांना सदर जमीन देण्याचे आदेश दिले आहेत त्याप्रमाणे या जमिनीची पाहणी देखील अधिकारी यांनी केली होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर,यांनी जिल्हाधिकारी यांना तसे पत्राने कळविले होते..
वंचित असलेल्या अनेक नागरिकांची घरकुलांची सुविधा ग्रामपंचायत कडे जागा शिल्लक नसल्याने आता ती पूर्तता होणार असून घरकुले मिळणार आहेत.तसा ३० ऑगस्टच्या ग्रामसभेत तसा ठराव मंजूर झाला होता..
असेही त्रिभुवन यांनी सांगितले.त्याचप्रमाणे उंदीरगाव ग्रामपंचायत साठी गट क्र ४२५.४३८ मधील ५ हेक्टर जमीन मंजूर करण्यात आली आहे.शिरसगाव ग्रामपंचायत साठी गट क्रमांक ५४ मधील गावठाण विस्तारसाठी ७.२३ हेक्टर,शासकीय घरकुलासाठी ०.६६ हे.घनकचरा व्यवस्थापनसाठी ३.००.पाणी पुरवठा योजनेसाठी २.००,असे एकूण १२.८९ हेक्टर जमीन शासन निर्णय क्र मशेम-२०२४/प्र.क्र.१७/ल-७ दि १३ मार्च २०२४ मंजूर करण्यात आली आहे.
या निर्णयाचे स्वागत शिरसगाव येथे फटाके वाजवून व ग्रामस्थांचे वतीने गणेशराव मुद्गुले यांचा सत्कार करण्यात आला व ना.राधाकृष्ण विखे पा.यांचे आभार मानले.अशा प्रकारे, एलमवाडी, निघोज, निमगाव कोऱ्हाळे, पिंपळवाडी, रांजणखोल,रुई,सावळीविहीर, नांदूर,उक्कलगाव,निमगाव खैरी, फत्त्याबाद,बेलापूर,मुठेवाडगांव,
वळदगाव,खंडाळा या सर्व ग्रामपंचायतसाठी विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी एकूण ९४.१२ हेक्टर शेती महामंडळाची जमीन मंजूर करण्यात आली आहे.
प्रस्तुत जमिनी स्थानिक स्वराज्य संस्था भोगवटदार वर्ग २ म्हणून धारणकरतील. गणेशराव मुद्गुले,सरपंच हरिगांव दिलीप त्रिभुवन,सरपंच राणीताई वाघमारे, उपसरपंच संजय यादव,सरपंच प्रतिभा गोलवड रमेश भालेराव सर्व ग्रा.पं.सदस्य यांनी ना.राधाकृष्ण विखे पा. यांचेसह दीपकअण्णा पटारे, नितीन दिनकर,आदी मान्यवरांना धन्यवाद दिले आहेत.
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरगांव
सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111