shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

शिक्षण सप्ताहअंतर्गत कौशल्य विकास आणि डिजीटल भरगच्च उपक्रमांची रेलचेल असणारा शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा


     मोर्शी तालुक्यातील यशप्रथित श्री विवेकानंद सेवा संघ संस्थेद्वारा संचलित नेरपिंगळाई येथील श्री विवेकानंद कन्या विद्यालया मध्ये ' शिक्षण सप्ताह , अत्यंत उत्साही ' आनंदी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना कौशल्य आणि डिजीटल नवोपक्रमांच्या अनेक वाटा त्याद्वारे ' अध्ययन ' अध्यापन साहित्य निर्मिती करुन त्यात कौशल्य प्राप्त झाले की विद्यार्थी उत्कृष्ट उद्योजक आणि व्यावसायीक होवू शकतात. या सद्‌विचारांनी नवे शिक्षण ' नवा ध्यास ' विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत. दर्जेदार शिक्षण मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. भारताचा एक सूजाण नागरिक व्हावा. या उदात्त हेतूने आणि 'राष्ट्रीय शिक्षण धोरण -20 20 च्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्य दि. 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत ' शिक्षण सप्ताह ' साजरा करण्याबाबत च्या निर्णयानुसार या शिक्षण सप्ताहात प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्येपूर्ण अस्तित्व नमूद करून सध्याच्या स्पर्धात्मक आणि डिजीटल कौशल्यांच्या युगांत भरारी घेणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे.



 म्हणून शिक्षण सप्ताहाचे आयोजनानुसार दि. 22 जुलै पहिल्या दिवशी डिजीटल तंत्रज्ञानाच वापर करुन कृतियुक्तअसे मार्गदर्शनातून शिक्षक तथा शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षक प्रतिनिधी श्री. योगेंद्र तट्टे सरांनी  विद्यार्थ्यांमध्ये साहित्य निर्मितीची जाणीव निर्माण केली. दि . जुलै -दुसऱ्या दिवशी 'मूतभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस ' या नुसार विद्यार्थ्यांना 'वाचन कौशल्या बाबत ' मार्गदर्शन श्री.पी. बी आडे सरांनी केलेत . वाचनाची गोडी निर्माण होणारे सुंदर हस्ताक्षरांतील चाटर्स तसेच मूलभूत संख्याज्ञानावर आधारित लाकडी ठोकळे ' कागदी मॉडेल्स ' चाटर्स नुसार पटकन आणि कायम उपयोगी पडणारे मार्गदर्शन श्री. निकेश चरोडे सरांनी दिले .दि 24 - क्रीडा दिवस याबाबत विद्यार्थ्यामध्ये आवड निर्माण व्हावी . क्रीडागुण विकसित झाला की विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होतो . यामध्ये स्वदेशी खेळ ' वैयक्तिक खेळ ' बुद्धिबळ ' यासारखे खेळातून विद्यार्थ्यांना भविष्यात ऑम्लिंपिक स्पर्धेतही सहभागी होण्याची सुवर्ण *संधी लाभते. तसेच अनेक जागतिक पर्यटक होण्याची संधी खेळातून मिळते . सर्वांगसुंदर व्यायाम ' प्राणायम ' याबाबत जागरूक असल्याने माणसाला निरोगी आयुष्य लाभते . देशभक्त भावना ' सांघिक भावना ' इतरांना स्वतःहून मदत करण्याची भावना ' संयम , शिस्त या मौलिक गुणांचा विकास खेळातून ' शारीरिक शिक्षणातून होते .याबाबत खेळामध्ये ' विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेवून त्यांनामार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा देशमुख ' यांनी केलेत. दि.25 चौथा दिवस - शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी कलागुण संपन्न व्हावे करिता वेशभूषा ' नाटककार , कलाकार ' नृत्य , वाक्पटू ' संवादपटू ' निवेदिका . Documentry  त्याचे सादरीकरण तंत्र आणि व्यावसायिक दृष्ट्या विद्यार्थ्यानी कलागुनांमध्ये कसे व्हावे याबाबत शास्त्रशुद्ध ' तंत्र असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना श्री. योगेंद्र तट्टे यांनी केलेत. दि. 26 जुलै - पाचवा दिवस या मध्ये विद्यार्थी व्यावसायिक दृष्ट्या 'उद्योगजक व्हावे करिता माती काम त्यातून अनेकविध सुबक ' सुंदर वस्तू बनविण्याचे तंत्र आणि प्रत्यक्ष कृतीतून ज्ञान विद्यार्थ्याना देवून त्यांचे कडून श्री गणपतीबाप्पाची सुबक 'मूर्ती साकारण्याचे ' मातीची उपयुक्त भांडी योग्य तंत्र श्री. रोशन भोजने यांनी शिकविलेत. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मातीकामाने गावकरी मंत्रमुग्ध करणारी ठरलीत. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक मंजुषा देशमुख यांच्या उपस्थितीत पर्यावरणप्रेमी श्री. पी.बी.आडे आणि श्री. योगेंद्र तट्टे , रोशन भोजने यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा ध्यास घेवून वृक्षरोपण करून त्याचे संवर्धन करण्याची शपथ घेतली . त्याकरिता एन् .बी . वाकोडे आणि विद्यार्थानी परिश्रम घेतलेत. दि . 27 जुलै - 6वा दिवस मिशन लाईकच्या दृष्टिक्षेपात इको क्लब राबविण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी सदा आनंदी , उत्साही राहून अध्ययनाचा ध्यास घ्यावे याकरिता बुद्धिला चालना देणारे सतुत्य असे अनेक उपक्रम कचरा न करणे ' प्लॉस्टिकचा वापर कायम बंद करणे , ई कचऱ्याची विल्हेवाट लावणे , स्वच्छतेबाबत जागरूकता ' किशोरींना तज्ञांचे मार्गदर्शन ' उर्जा बचतीचे महत्व ' जलसंवर्धन , पाण्याचे जतन करणे , परसबाग निर्मिती तंत्र कृतियुक्त शिक्षण अनेक उपयुक्त आणि काळाची गरज असणाऱ्या अनेकविध उपक्रमांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . आणि दि .28 जुलै 2024 ' शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव समुदाय सहभाग ' यादिवशी शाळांचे सक्षमीकरण व्हावे ' लोक सहभागातून शाळेचा विकास व्हावा , शाळा व समाज यांच्यात उत्तम नाते निर्माण व्हावे याबाबत सौ. कळसकर मॅडम (माजी केंद्रप्रमुख ) यांनी समुदायाला मार्गदर्शन केलेत . याप्रसंगी मुख्याध्यापक सौ .मंजुषा देशमुख शिक्षक श्री .योगेंद्र तट्टे , पी.बी. आडे ' समीक्षा भोजने मॅडम ' निकेश चरोडे , रोशन भोजने ' एन् .बी . वाकोडे ' पुष्पाबाई सावरकर आणि भरगच्च विद्यार्थी समुदाय उपस्थितीत भरगच्च उपक्रमांनी नटलेला ' शिक्षण सप्ताह अत्यंत उत्साही अन् आनंदी वातावरणात ' एकमेकांस सहाय्य करू अवघे धरु शिक्षणपंथ ' जयघोषात संपन्न झाला .आणि समारोप ' यथेच्छ , स्वरुचि , सामुदायीक तिथी भोजनाने झाला.
close