shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

!! डास !!


जेथे साचते पाणी घरी आणि घराबाहेर ! तेथे वाढती डास घरी आणि घराबाहेर !!धृ!!स्वच्छ पाण्याचे साठे रांजन,माट आणि टाके !


 डब्बे,कुलर,टायर,हौद,बाटल्या,शोभिवंत कारंजे ! पाण्याच्या टाक्या,वाहती झरे,झिरपणारे पाणी!हिच आहेत अँनाफेलीस, एडीज, डासांची स्थानी !!१!! गटारे,घाण पाण्याचे डबके,नाल्या ,खतखड्डे ! तलावातील वनस्पतींच्या पाणाखाली,बाथरूम खड्डे! सेप्टीक टँक,भात शेतीतील स्वच्छपाणी ही क्युलेक्सची अड्डे!!२!! अँनाफेलीस, एडिज,क्युलेक्स डासांची आवडती स्थाने ! स्वचछ पाणी,घाण पाणी ही अंडी घालण्याची स्थाने ! अंडी,अळी,कोष,विकसित डास या पाण्यातील अवस्था !!३!! अंडयातून २४ते ४८ तासात अळी बाहेर येते ! चार अवस्थातून अळया जात असते ! प्रत्येक अवस्थेस इंस्टार म्हणतात !!४!! प्रथम इंनस्टारमधून दुसऱ्या इंनस्टारमध्ये ! दुसऱ्या इंनस्टारमधून तिसऱ्या इंनस्टारमधे !तिसऱ्या इंनस्टारमधून चौथ्या इंनस्टारमधे !!५!! अळी आपली त्वचा सोडून देत असते !साप कात टाकतो तशी अळी त्वचा सोडीत असते ! याला ७ ते ८दिवस लागतात ! त्वचा सोडण्याला मोल्टींग म्हणतात ! त्यानंतर कोष तयार होतात !!६!!कोष अवस्थतील डासांचे रूपातर एका दिवसात प्रोढ डासात होते ! नर आणि मादी सारख्या प्रमाणात उत्पन्न होते ! त्यांच आपल सारखच असते !!७!! ज्याला असतात मिशा त्याला नर म्हणतात! ज्यांना नाही मिशा त्यांना मादी म्हणतात !!नर डास कधीच कोणाला चावत नसते ! कारण त्याची सोंड आखूड आणि बोथड असते !!८!!    बिचारा सडका काडी ,कचरा पाणातील रस शोषून जीवन जगत असते! एकदा मादीशी मिलन झाले की तीन,चार दिवसात मरते ! मादीच मात्र उलटेच असते !!९!! मादी डासांची सोंड लांब आणि तिक्ष्न असते ! त्यामुळे ती चावा घेउन रक्त शोषत असते! एकदा नराशी मिलन झाले की त्याची गरज नसते ! शुक्रजंतू ती पुढील प्रजोत्पादनासाठी राखून ठेवित असते!!१०!! तिन ते चार आठवडे सहज जीवन जगते! उष्णता,आद्रता हयावर जीवनकाल अवलंबून असते ! मादीडास सर्व किटकजन्य आजाराचा प्रसार करते ! कारण तिच्या शरीराची रचनाच तशी असते !!११!! परोपजिवी जंतू जगण्यासाठी तिच्यात बदल घडत असते ! मादीपासून हिवताप,हत्तीरोग,, डेंग्यु, चिकणगुनियाचा प्रसार होते ! डास झाले खूप म्हणून हिवताप, हत्तीरोग, डेंग्यु, मेंदुज्वर, चिकनगुनिया होत नसते !!१२!!नसेल दुषित रूग्न, विषाणू तर डास खूप चावले तरी रोग होत नसते ! रूग्न शोध आशा,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका करते ! प्रयोगशाळा,दवाखाने येथे रोजच सुरू असते ! म्हणून ताप आल्याबरोबर रक्ताची तपासणी करा ! हिवताप, डेंग्यु, चिकनगुनिया नाही याची खात्री करा !!१३!!होता निदान आजाराचे उपचार मोफत मिळत असते ! हाच मात्र आरोग्याचा एकमेव उपाय दिसते !रांजन,माट,टाके,टाक्या नेहमी झाकुन ठेवा ! असेल आवश्यकता तेवढेच पाणी भरून ठेवा !!१४!! फुटके,तुटके,माट,मडके, डब्बे,टायर यांना नष्ट करा ! घराघरात,गावागावात पडीत विहिरीत गप्पीमासे सोडा ! गावातील नाल्या वाहत्या करणे जबाबदारी ग्रामपंचायतीची ! शहरातील नाल्या वाहत्या ठेवणे जबाबदारी नगरपालीकेची !! १५!!आठवडी अळीनाशक फवारणी करा !बाथरूमच्या खड्याचा शोषखड्डा करा !  ज्यांचा असेल संडास त्यांच्यावर कर लावा ! ग्रामपंचायतने व्हेंट पाईपला जाळया लावा !! रिकामे खड्डे डासांची उत्पत्ती स्थाने त्यांना बुजवून टाका !!१६!!ग्रामपंचायतने ,खतखड्डे गावातून दुर करा !हत्तीरोग, चंडीपूरापासून बचाव आहे खरा ! हातोहात श्रमदान करा गाव होईल स्वच्छ ! रोगापासून मुक्त व्हावे हिच जनांची ईच्छा !!१७!! वाढेल आयुष्य,धन,संपदा मंत्र आहे महान ! किटकजन्य आजाराने न जाईल कोणाचा प्राण !!१८

डॉ.शरद जोगी
जिल्हा हिवताप अधिकारी
अमरावती
close