shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार आर्थिक विकास महामंडळास ५० कोटीची आर्थिक तरतूद केल्याबद्दल वडार समाज संघाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार..!


मुंबई:- 
३ जुन २०१८रोजी लातुर येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाचा महामेळावा घेऊन ११ शासननिर्णय लवकरच काढण्यात येतील अशा घोषणा केल्या होत्या. त्यानंतर फडणवीस सरकार कोसळले. सरकार कोसलल्यानंतर शासननिर्णय प्रलंबीत राहीले. त्यांचे सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. तसा शासननिर्णय काढण्यात आलेला आहे. परंतू आर्थिक तरतूद करण्यात आली नव्हती. दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी  उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या मलबार हिल येथील सागर बंगल्यावर ७५ वर्षात प्रथमच वडार समाजाची संवाद बैठक  पिराजी मामा मंजुळे रावि शिंदे, राजू जाधव, यांच्या माध्यमातून  आयोजित करण्यात आली होती.


   यावेळी उपमुख्यमंत्री यांनी वडार समाजाचे देशाच्या विकासासाठी फार मोठे योगदान आहे.ज्या समाजाने सिंचनाच्या, दळणवळणाच्या सोयी सुविधा निर्माण केल्या, असा समाज वंचित राहु नये यासाठी सरकार प्रयत्न करेल. असे आश्वासन दिले.तसेच आर्थिक विकास महामंडळाला ५० कोटी देण्याची घोषणा केली. तसेच १५ लाखापर्य़ंतचे कर्जासाठी नोकरदार जामीनदाराची आवश्यकता नाही. तसेच वडार मजूर संस्थांना  मंत्रीमंडळात विचार करून सर्व प्राधिकरणामध्ये कामे आरक्षित करू.असे बैठकी दरम्यान सांगितले. 

      यावेळी उपमुख्यमंत्री यांनी वडार समाजाला उशीरा का होईना न्याय दिला आहे म्हणून वडार समाज संघाचे कार्याध्यक्ष रामचंद्र मंजुळे, प्रदेश सचिव रमेश जेठे (सर),उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मुरलीधर शेलार यांनी त्यांचा सत्कार केला.
close