अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंचांना त्यांच्या हक्क व कर्तव्याची जाणीव करत त्यांची एकजूट करण्याच्या उद्देशाने अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर परिसरात सरपंच एकता परिषद उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगळ ग्रह संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर पिंपरी सरपंच प्रेमराज चव्हाण आणि सात्रीच्या सरपंच सुनीता बोरसे हे उपस्थित होते.
यावेळी प्रास्तविकात समाधान पारधी म्हणाले की, गावं लहान असो की मोठे समस्या मात्र सारख्याच असतात. आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी घडवून आणलेला कार्यक्रम म्हणजे आजची सरपंच एकता परिषद होय. गावाचा प्रथम नागरिक म्हणून सेवा करण्याचे भाग्य हे फक्त सरपंच यांना लाभते.
लोण चारम येथील सरपंच प्राचार्य मंदाकिनी भामरे यांनी सरपंच पती ऐवजी स्वतः महिला सरपंचांनी विविध जनजागृती पर कार्यक्रमाना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.कोंडावळ येथील सरपंच डॉ भूषण पाटील यांनी ग्राम पंचायत अधिनियम कायदा १९५८ नुसार जनजागृती करून उपस्थित सरपंच यांना मार्गदर्शन केले. गांधली येथील सरपंच नरेंद्र पाटील यांनी सरपंच यांनी कामकाज व अडचणी या विषयी माहिती दिली.नगाव येथील सरपंच सरिता गोसावी यांनी वृद्ध,महिला,बालके,यांच्या साठीच्या विविध योजना अमलात आणण्यासाठी सरपंच बनली असल्याचे सांगितले.गडखांब येथील सरपंच नितीन पाटील यांनी गावाला न्याय देणे शक्य असेल तरच पद स्वीकारा.एक निष्क्रिय सरपंच गाव पाच वर्षे मागे नेतो असे मत व्यक्त केले. दहीवद येथील सरपंच देवानंद महाले यांनी गावातील जिल्हा परिषद आदर्श घडवली तर ५० महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. तर प्रिंप्री येथील सरपंच प्रेमराज चव्हाण यांनी शासन सरपंच यांना प्रशिक्षण देण्यासाठी मोठा खर्च करते म्हणून सर्व सरपंच यांनी होणाऱ्या सर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.
या वेळी अध्यक्षीय भाषणात बोलतांना एस. एन. पाटील म्हणाले की सरपंच एकता परिषद ही संघटना नोंदणीकृत होणे गरजेचे आहे. एकता परिषदेचे काम हे संपुर्ण महाराष्ट्र भर पोहचवायचे आहे. आपल्या मागण्या व हक्कासाठी सरपंच एकता परिषदेच्या माध्यमातून काम करू. आपण संघटित झाल्या शिवाय आपल्या समस्या व अडचणींवर मार्ग निघणार नाही. सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक असुन त्यांनी जागृत राहणे गरजेचे आहे.येणाऱ्या काळात हिवरे बाजार सह महाराष्ट्रातील आदर्श ग्राम पंचायती यांना भेटी देण्यासाठी अभ्यासदौरे आयोजित केले जातील असे मत त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगळ ग्रह सेवा संस्थेचे कार्यालय अधीक्षक भरत पाटील तर आभार दामोदर पाटील यांनी मानले.
या वेळी ह सरपंच राजश्री पाटील (हिंगोणे), रजनी पाटील (आमोदे), वर्षा पाटील (पिंपळे), महेंद्र राजपूत (भिलाली), प्रा सुरेश पाटील (एकरुखी), सुनील पाटील (अंबारे, खपरखेडे), मच्छिंद्र पाटील (खडके), प्रवीण पाटील (निसर्डी), भूषण पाटील (कोंढावळ), अशोक पाटील (लोंढावे), भगवान पाटील (कामत वाडी), मनीषा पाटील (हेडावे), अर्चना पाटील (सुंदरपट्टी), देवानंद बहारे (दहिवद), चेतन पाटील (वाघोदे), राकेश ठाकरे (मेहरगाव), कल्पना चौधरी (जळोद), मालुबाई पाटील (रुंधाटी), मगण कोलाईत (मुडी दरेंगाव), दर्शन पाटील (दापोरी), चंद्रकांत पाटील (कंडारी), तारकेश्वर गांगुर्डे (मठगव्हान) यांच्यासह तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.