प्रतिनिधी : रफिक शेख
थिटेसांगवी : ३ / सर्जा- राजाचा सण बैल पोळा श्रीगोंदा तालुक्यातील थिटेसांगवी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने गावातील शेतक-यांनी आपल्या शेतात वर्षभर राब-राब राबणारा तसेच आपला खराखुरा सोबती असलेल्या बैलांचा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. थिटेसांगवी येथे पारंपरिक पद्धतीने गावच्या वेशीत तोरण बांधून बैल पोळा भरला जातो. वाडी वस्तीवरील सर्व शेतकरी आपल्या बैलांना सजवून गावात मिरवणुकीसाठी घेऊन येतात. गावातील हनुमान मंदिरासमोर बैलाची पुजा अर्चा करून वेशीमधुन बैलांना मानवंदना देण्यात येते .
यावेळी मानाच्या बैलांनी पोळा फोडण्यात येतो अशी पारंपरिक प्रथा आहे. यावेळी थिटेसांगवी येथील मा.श्री सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिति श्रीगोंदा संचालक अर्जुन(देवा) शेळके व बलभीम (अप्पा) शेळके कुटुंबाच्या बैलांचे विशेष आकर्षण पाहण्यासाठी मिळाले. बैलांना विविध रंगबेरंगी रंगाने सजवले होते बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग देवून अंगावर झुला टाकुन आकर्षक रंगांनी सजवून नटलेल्या बैलांना मोठ्या थाटामाटात थिटेसांगवी येथुन पारंपारिक वाद्यांच्या तालावर बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. व आपल्या बैलांना पोळ्याच्या मानासाठी गावच्या वेशीत आणले होते.याचप्रमाणे अनेक भागातील शेतक-यांनी सुध्दा आपले बैल वाजत गाजत गावातील पोळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणले होते.
या बैल पोळ्याच्या उत्सवात ग्रांमस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.